परकीय चलनात तीन महिन्यांत एकोणीसशे कोटींची वृद्धी; कांदा निर्यातीत ३७५ कोटींनी वाढ 

senior citizen with money.jpg
senior citizen with money.jpg

नाशिक : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांत शेतमालाच्या निर्यातीत आशादायी स्थिती पाहायला मिळाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तीन महिन्यांत यंदा एकोणीसशे कोटींची अधिकचे परकीय चलन निर्यातीतून मिळाले आहे. कांद्याच्या निर्यातीत ३७५ कोटींनी वाढ झाली आहे. दुसरीकडे मात्र एक रुपयाच्या आंब्याची निर्यात होऊ शकलेली नाही. शिवाय द्राक्ष निर्यातीला ३५ कोटींचा फटका बसला आहे. 

परकीय चलनात तीन महिन्यांत एकोणीसशे कोटींची वृद्धी
यंदा एप्रिल ते जूनमध्ये ४६ लाख ५१ हजार ९५५ टनाची निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ३८ लाख ४७ हजार ७६४ टन निर्यात झाली होती. शेतमालाच्या निर्यातीतील ही वृद्धी १७.२८, तर चलनामध्ये दहा टक्के राहिली. यंदा २० हजार ५९९ कोटींची, तर गेल्या वर्षी १८ हजार ६५८ कोटींची निर्यात झाली. कृषीपंढरी नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांच्या विक्रीचा गंभीर प्रश्‍न लॉकडाउनमध्ये तयार झाला होता. जहाजांमधून रवाना झालेल्या द्राक्षांना ग्राहक मिळाले नाहीत. परिणामी, चांगल्या दर्जाचे उत्पादन करूनही ग्राहकांअभावी ३२८ कोटींची निर्यात होऊ शकली नाही. गेल्या वर्षी ३६३ कोटींची निर्यात झाली होती. ताज्या भाजीपाल्याची अवस्था द्राक्षांसारखी राहिली. ४०० कोटींच्या भाजीपाल्याची निर्यात झाली. गेल्या वर्षी तीन महिन्यांत ४३४ कोटींची भाजीपाला निर्यात झाली होती. फळे आणि भाजीपाल्याच्या बियाण्यांच्या निर्यातीत १०२ कोटींची घट झाली. यंदा १८४, तर गेल्या वर्षी २८६ कोटींची निर्यात झाली. जगभरात मागणी असलेल्या बासमती तांदळाला ३१ कोटींचा फटका बसला. यंदा तीन महिन्यांत आट हजार ६९७ कोटींची, तर गेल्या वर्षी आठ हजार ७२८ कोटींची निर्यात झाली. मात्र, इतर तांदळाच्या निर्यातीत आशादायक स्थिती दिसून येते. बासमती व्यतिरिक्त इतर तांदळाची दोन हजार ४३७ कोटींनी अधिक निर्यात झाली आहे. 


मक्याची २३३ कोटींनी निर्यात घटली 
मक्याला जगाच्या बाजारपेठेत मागणी राहिली नाही. त्यामुळे यंदाच्या तिमाहीत १८ कोटींची निर्यात झाली. गेल्या वर्षी २५१ कोटींच्या मक्याची निर्यात झाली होती. कांद्याच्या उत्पादनातील घटमुळे निर्यातबंदी केंद्र सरकारने केली. आता भाव आटोक्यात येत नाहीत म्हटल्यावर साठवणुकीवर मर्यादा आणल्याने त्याचे पडसाद बाजारपेठेतील भावावर उमटले. भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले. अगोदर निर्यातबंदी होण्याच्या अगोदर सीमेवर आणि बंदरात कांदा अडकविण्यात आला होता. ही स्थिती एकीकडे असताना कांद्याची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७५ कोटींनी अधिक झाली. यंदा एप्रिल ते जूनमध्ये एक हजार १८० कोटींच्या कांद्याच्या निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या तिमाहीत ८०६ कोटींची निर्यात झाली होती. 


शेतमालाच्या निर्यातीची तुलनात्मक स्थिती 
(एप्रिल ते जूनमधील विक्रीचे आकडे कोटी रुपयांमध्ये दर्शवतात.) 

शेतमाल २०२०-२१ २०१९-२० 
तांदूळ पाच हजार ८५२ तीन हजार ४१५ 
प्रक्रियायुक्त भाजीपाला ८२४ ६७१ 
शेंगदाणे ७५१ ८०९ 
डाळी ७४५ ४८८ 
ताजा आंबा ० ३५१ 
गवार ४९९ ९८५ 
ताजी फळे ४३० ४१८ 
गहू २१९ ८४ 
मध १८४ २८६ 


तृणधान्ये १०६ १५४ 
आंब्याचा पल्प १०१ ९२ 
फुले ९४ १४५  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com