दातृत्वाला सलाम! दागिने मोडून सैनिकांना मदतीचा हात; निशिगंधा मोगल यांचे नाशिककरांकडून कौतुक

Nishigandha mogal
Nishigandha mogal

नाशिक : स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे धावत असताना माजी आमदार निशिगंधा मोगल यांनी सैनिकांप्रती प्रेम दाखवतं स्वताचे दागिने मोडून वीस लाखांचा जमविलेला निधी ध्वजनिधी म्हणून सैनिक कल्याण मंडळाकडे सुपुर्द केला. त्यांच्या या सैनिकी प्रेमाचे नाशिककरांकडून कौतुक होत आहे.

देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी लावून लढणाया सैनिकांची सुरक्षा करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याची भावना श्रीमती मोगल यांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्यानिमित्त भाजप महिला आघाडीच्या वतीने निवासस्थानी सत्कार करण्यात आला. आमदार सीमा हिरे, रोहिणी नायडु, रोहिणी दळवी, शिल्पा परनेरकर, तृप्ती कुलकर्णी, पूर्वा सावजी, मनिषा देवरे, रश्मि हिरे- बेंडाळे आदी उपस्थित होते.

सर्व स्त्रीधन सैनिकांच्या कल्याणासाठी अर्पण 

यावेळी आमदार हिरे म्हणाल्या, प्रत्येक महिलेला तिचे दागिने प्रिय असतात. दागिन्यांमध्ये मंगळसुत्रावर अधिक प्रेम केले जाते. या स्त्री धना मध्ये आयुष्याभरच्या भावना गुंतलेल्या असतात. या परिस्थिती मध्ये प्रिय असलेले स्त्रीधन देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी अर्पण करण्याचे महत्वाचे कार्य निशिगंधा मोगल यांनी केले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवताना सैनिकांना प्राणाची आहुती देखिल द्यावी लागते. वीरमरण प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना ध्वजनिधीच्या माध्यमातून मदत दिली जाते. देशावरचे प्रेम व सैनिकांबद्दल असलेले आपले कर्तव्य या भावनेने प्रेरित होवून समाजाचे आपणही काही देणे लागतो या उदात्त हेतुने निशिगंधा मोगल यांनी स्वत:चे सर्व स्त्रीधन अर्पण करुन सैनिकांच्या कल्याणासाठी दिलेला वीस लाख रुपयांचा निधी कौतुकास्पद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com