शिवसेनेकडून पर्दाफाश..कोरोनाच्या नावाखाली सुरू धक्कादायक प्रकार..'या' रुग्णालयांना नोटीस

nurse corona.jpg
nurse corona.jpg

कोरोनाच्या नावाखाली रुग्णांची लूट..
 

शिवसेनेकडून पर्दाफाश..कोरोनाच्या नावाखाली सुरू धक्कादायक प्रकार
 
नाशिक : गेल्या 25 दिवसांत शहरात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजार 600 पार गेला आहे. रोज 100 ते 150 रुग्ण वाढत असून, सहा ते आठ जणांचा बळी जात असल्याने राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रशासनावर थेट हल्लाबोल करत आरोप केला.

शिवसेनेकडून पर्दाफाश...कोरोनाच्या नावाखाली सुरू धक्कादायक प्रकार

गेल्या 25 दिवसांत शहरात कोरोनाबाधितांचा आकडा एक हजार 600 पार गेला आहे. रोज 100 ते 150 रुग्ण वाढत असून, सहा ते आठ जणांचा बळी जात असल्याने राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रशासनावर थेट हल्लाबोल करत खासगी रुग्णालयांसाठी महापालिका काम करत असल्याचा आरोप केला. 
महापालिकेकडून गरीब रुग्णांची हेळसांड केली जात आहे. खासगी रुग्णालयात गरीब रुग्णांना दाखल होण्याचा सल्ला दिला जातो. खासगी रुग्णालयांसाठी शासनाने दर ठरवून दिले असताना कॉर्पोरेट हॉस्पिटलकडून 12 ते 16 लाखांपर्यंतची बिले काढली जात आहेत. या संदर्भातील पुरावे बोरस्ते यांनी महापालिका प्रशासनाकडे सादर केले. वाढीव बिले तपासण्यासाठी भरारी पथके तयार केली. रुग्णांची लूट सुरू असताना भरारी पथके नेमके करतात काय? असा सवाल करताना बोरस्ते यांनी पथकांनी रुग्णालयांशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. रुग्णांच्या लुटीमुळे शासनाची बदनामी होत असल्याने शिवसेनेचा संयम सुटल्याचा इशारा बोरस्ते यांनी दिला. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेची रुग्णालये फुल झाली आहेत, तर खासगी कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये उपचाराच्या नावाखाली लाखो रुपये उकळले जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सह्याद्री रुग्णालयात दाखल झालेल्या देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्याकडून अतिरिक्त बिल वसूल केल्याच्या तक्रारीनुसार महापालिकेने रुग्णालयाला नोटीस बजावली. वडाळा येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात एका रुग्णाकडून सव्वा लाख रुपये अतिरिक्त वसूल केल्याने महापालिकेचे लेखाधिकारी बी. जी. सोनकांबळे यांनी नोटीस बजावली. याविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत थेट आयुक्तांवरच प्रश्‍नांचा मारा केला आहे. 

याचा व्हावा खुलासा 
पीपीई किटची किंमत बाजारात 500 रुपये असताना खासगी रुग्णालयांकडून अडीच हजार रुपये उकळले जातात. एका पीपीई किटमध्ये रुग्णालयात दाखल सर्व रुग्णांची तपासणी होणे शक्‍य असतानाही प्रत्येक रुग्णांकडून प्रत्येक दिवसाचे व प्रत्येक तपासणीचे शुल्क वसूल केले जाते. रुग्णांच्या तपासण्या कशा प्रकारे व कोणत्या दरात कराव्यात, यासंदर्भात शासनाने निकष ठरविले असताना रुग्णालयांकडून अतिरिक्त बिल आकारले जाते. आर्थिक लूट होत असताना महापालिकेने काय कारवाई केली, विशेष टास्क फोर्स का स्थापन झाली नाही, आदी प्रश्‍नांबाबत खुलासा होण्याची मागणी श्री. बोरस्ते यांनी केली. 

लुटीमागे प्रशासनाचे षडयंत्र असल्याचा दाट संशय
चौकशी केल्यानंतर खासगी रुग्णालयांना नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडल्याने लुटीमागे प्रशासनाचे षडयंत्र असल्याचा दाट संशय आहे. भाजपचे शहरातील तीनही आमदार व महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचे शहराकडे दुर्लक्ष होत असताना निदान प्रशासनाने तरी जनतेला न्याय द्यावा. - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता 

शासनाकडे तक्रार 
इंदिरानगर भागातील अशोका मेडिकव्हर रुग्णालयासंदर्भात दोन तक्रारींचा दाखला देत श्री. बोरस्ते यांनी लुटीचा पर्दाफाश केला. पंचवटीतील मनोज लुंकड यांचे काका सुरेश लुंकड यांना न्यूमोनिया झाला म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीन दिवसांनी कोरोना टेस्ट घेतली, त्या वेळी अहवाल निगेटिव्ह आला. दहा दिवसांनी पुन्हा चाचणी करण्यात आली, त्या वेळी अहवाल पॉझिटिव्ह दाखविला गेला. या काळात रुग्ण मृत झाले. 24 दिवसांचे बिल तब्बल 12 लाख रुपये काढले गेले. रोज 50 हजार रुपये भरण्याची सक्ती केली गेली. सुभाष तिडके यांच्यासंदर्भातदेखील असाच अनुभव आला. त्यांच्याकडून 23 दिवसांचे आठ लाख रुपये बिल वसूल करण्यात आले. या दोन्ही रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. 

आमदार सरोज आहिरेंकडून अतिरिक्त बिलवसुली 

कोरोनाच्या उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल झालेल्या देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांची फसवणूक झाल्याची तक्रार केल्यानंतर महापालिकेने रुग्णालयांना नोटीस बजावली. वडाळा येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात एका रुग्णाकडून सव्वा लाख रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आल्याने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. जी. सोनकांबळे यांनी नोटीस बजावली आहे. दोन दिवसांत आवश्‍यक कागदपत्रे जमा करून खुलासा करावा अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. 

नाशिकमधील या रुग्णालयांना नोटीस
देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाकडून त्यांना साठ हजार 227 रुपयांचे देयके देण्यात आले. हे बिल अतिरिक्त असल्याचा संशय आल्यानंतर आमदार आहिरे यांनी महापालिकेच्या तपासणी पथकाकडे तक्रार केली. पथकाने देयकांची तपासणी केली असता, शासन निर्देशानुसार 49 हजारांचे बिल येणे अपेक्षित असताना रुग्णालयाकडून अकरा हजार रुपये अतिरिक्त वसूल करण्यात आले. दुसऱ्या एका घटनेत अशोका मेडिकव्हर रुग्णालयासंदर्भात दिलीप आहेर यांनी तक्रार दिली. त्यांच्याकडून तीन लाख दहा हजार रुपयांचे बिल वसूल करण्यात आले. शासन निर्देशानुसार एक लाख 84 हजार 81 रुपये बिल येणे अपेक्षित असताना सुमारे सव्वा लाख रुपये अतिरिक्त त्यांच्याकडून वसूल करण्यात आले. दोन्ही तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने अनुक्रमे सह्याद्री व अशोका मेडिकव्हर रुग्णालय व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. 


कोरोनाच्या निमित्ताने खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल वसूल केले जात असून, यासंदर्भात विधानसभेत प्रश्‍न उपस्थित करणार आहे. कोरोनाच्या नावाखाली गरिबांची लूट सुरू आहे. -सरोज आहिरे, आमदार 

शहरातील खासगी रुग्णालय व्यवस्थापनाकडून शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. पालन न केल्यास रुग्णालयांवर गुन्हा दाखल करू. महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत शासन बिले देणार आहे. -राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com