PHOTO : दुल्हे की बारातमें "नो सीएए, नो एनआरसी! 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 28 जानेवारी 2020

विवाहानंतर सुलेमानी चौकात दस्तूर-ए-हिंद बचाव समितीच्या घोषित आंदोलनानुसार वऱ्हाडी मंडळींना मुश्‍तकीम यांनी संविधान प्रस्तावनेची शपथ दिली. त्यामुळे नाझीमचा विवाह शहरात चर्चेचा ठरला. नो सीएए मिशनमध्ये नवरदेवासह वधूपक्षही मोठ्या उत्साहात सहभागी झाला.

नाशिक : मालेगाव शहरातील हकीमनगर भागातील तरुण नाझीम बशीर शेख याचा निकाह शहरात चर्चेचा ठरला. 26 जानेवारीचा मुहूर्त, बारात व विवाह सोहळ्यात तिरंग्यासह नो सीएए, नो एनआरसीचे फलक लक्ष वेधून घेत होते. अन्‌ मग त्यातच या सोहळ्याला आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, नगरसेवक एजाज बेग, मुश्‍तकीम डिग्निटी यांनी हजेरी लावत चार चॉंद लावले. वऱ्हाडींनी फलक घेऊन "नो सीएए'ची घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. 

Image may contain: 2 people, people standing and outdoor

नाझीमचा विवाह शहरात चर्चेचा ठरला
विवाहानंतर सुलेमानी चौकात दस्तूर-ए-हिंद बचाव समितीच्या घोषित आंदोलनानुसार वऱ्हाडी मंडळींना मुश्‍तकीम यांनी संविधान प्रस्तावनेची शपथ दिली. त्यामुळे नाझीमचा विवाह शहरात चर्चेचा ठरला. नो सीएए मिशनमध्ये नवरदेवासह वधूपक्षही मोठ्या उत्साहात सहभागी झाला. विवाह सोहळ्यात काही तरुण तिरंगा घेत दुचाकीवरून घोषणा देत सहभागी झाले. सकाळी शहरातून राष्ट्रध्वज फडकवत विविध ठिकाणाहून दुचाकी फेऱ्या काढण्यात आल्या. यामुळे परिसरासह अनेक भागातील वाहतूक विस्कळित होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती. 

हेही वाचा > रखडलेल्या कामांसाठी 185 कोटी - भुजबळ ​

हेही वाचा > उद्योजकांसाठी "फॅसिलिटी'ची भूमिका सरकारने बजवावी : छगन भुजबळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No CAA, No NRC protest panel at wedding at Malegaon Nashik News