नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला आणखी एक तडाखा? सतर्कतेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 2 June 2020

जिल्हास्तरावरून सर्व तहसीलदारांनाही आवश्‍यक उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. 1) शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. मालेगावसह काही भागात हलका पाऊसही झाला. येत्या काही दिवसांत अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा व वादळ, वीज कोसळणे आदी स्वरूपाच्या संकटांना सामोरे जावे लागू शकते.

नाशिक : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्‍चिम किनारपट्टीवर वादळ धडकणार हे निश्‍चित झालेले आहे. मात्र, सुरवातीला उत्तरेकडे वाटचाल करणारे हे वादळ आता दक्षिणेकडे वळल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला तडाखा बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. येत्या गुरुवार (ता. 4)पर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्‍यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाला सतर्क राहाण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. 

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा ​

जिल्हास्तरावरून सर्व तहसीलदारांनाही आवश्‍यक उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (ता. 1) शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. मालेगावसह काही भागात हलका पाऊसही झाला. येत्या काही दिवसांत अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा व वादळ, वीज कोसळणे आदी स्वरूपाच्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. सावधगिरीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर, सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था, निर्जंतुकीकरण, कोविड रुग्णांचे स्थलांतर, औषध पुरवठा, मास्क व पीपीई किटचा साठा, आपत्ती व्यवस्थापनाच्या खबरदारीसह अन्य मदतकार्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.  

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

हेही वाचा > आजी-आजोबांची भेट.. अवघड वळणाचा घाट.. जणू वाट बघत होता तिघांचा काळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Maharashtra including Nashik blow of "nature" is possible nashik marathi news