हॉटस्पॉट असूनही केली मनमानी..आता भोगा परिणाम!

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 12 June 2020

बाजारपेठा उघडल्यानंतर खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. प्रामुख्याने गुरुवारी (ता.11) शहरातील महाराष्ट्र बॅंक, देना बॅंक, स्टेट बॅंक येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली.

नाशिक / मालेगाव  : कोरोना संसर्गानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काही प्रमाणात लॉकडाउन शिथिल करताना प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. बाजारपेठा उघडल्यानंतर खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. या सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. प्रामुख्याने गुरुवारी (ता.11) शहरातील महाराष्ट्र बॅंक, देना बॅंक, स्टेट बॅंक येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. शहरात असंख्य जण विनामास्क फिरताना आढळून आले.

 दोन तासांत 41 हजाराची दंड वसुली 

त्याची दखल घेत पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दोन तास विशेष मोहीम राबविली असता प्रतिबंधात्मक आदेश व मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 217 जणांविरुद्ध वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. प्रामुख्याने मास्क न वापरणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला. अवघ्या दोन तासांत 40 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला. 

पोलिसांनी केले सुमारे एक हजार मास्कचे वाटप
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, दिलीप पारेकर, खगेंद्र टेंभेकर, गुलाबराव पाटील, बाळासाहेब थोरात, प्रवीण वाडिले, बशीर शेख, दिगंबर पाटील आदींनी शहरात विविध ठिकाणी बॅरिकेड्‌स व नाकाबंदी करत मोहीम राबविली. या वेळी 217 जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करतानाच जे नागरिक मास्क विकत घेऊ शकत नाहीत, अशा गरजूंना पोलिसांनी सुमारे एक हजार मास्कचे वाटप केले.

 हेही वाचा > PHOTOS : दुर्दैवी घटना! पोलीस अधिकारीच्या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा..सुट्टीनिमित्त घरी जातानाच काळाचा घाला..पाहा

कठोर कारवाईचा इशारा

शहरवासीयांनी प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करीत अत्यावश्‍यक कामांसाठीच घराबाहेर पडावे. खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क वापरावे, सार्वजनिक जागेवर थुंकू नये, असे आवाहन करतानाच प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला. 

 हेही वाचा > धक्कादायक! ३५ वर्षांचा घरोबा..सख्खे शेजारी..कुटुंबासाठी धावणाऱ्यांचाच विश्वासघात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not using masks cost Malegaon residents dearly nashik marathi news