esakal | 'तक्रार मागे घे नाहीतर!'...दोन वर्षाचा वाद 'त्याच्या' जीवावर
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या वादातून हाणामारी.jpg

जुन्या वादाची पोलिसांत दिलेली तक्रार मागे न घेतल्याच्या वादातून तरुणास मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केल्याचा प्रकार रविवारी (ता.16) घडला. किरण गागरे (वय 28, रा. पंचवटी) गंभीर जखमी झाला. भद्रकाली पोलिसांत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

'तक्रार मागे घे नाहीतर!'...दोन वर्षाचा वाद 'त्याच्या' जीवावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) जुन्या वादाची पोलिसांत दिलेली तक्रार मागे न घेतल्याच्या वादातून तरुणास मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केल्याचा प्रकार रविवारी (ता.16) घडला. किरण गागरे (वय 28, रा. पंचवटी) गंभीर जखमी झाला. भद्रकाली पोलिसांत या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

असा आहे प्रकार

संशयित कृष्णा जाधव ऊर्फ कृष्णा हांडी (रा. पोलिस मुख्यालय वसाहत), विजय पाटील (रा. अमृतधाम रोड, पंचवटी), सौरभ हिरवे (रा. वृंदावननगर), सूरज वर्मा (रा. अमृतधाम) यांच्याशी 15 ऑगस्ट 2018 मध्ये वाद झाला होता. आडगाव पोलिसांत संशयिताविरुद्ध किरण याने तक्रार दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून रविवारी संशयित टाकळी रोड येथील गॅरेजमधून बरोबर घेऊन गेले. अमरधाम रोड, शितळा देवी मंदिर परिसरात किरणला आडगाव पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. त्यास नकार दिल्याने त्यांनी मारहाण करत जखमी केले. तपोवन रोड, केवडीवन येथे त्याला सोडून पळून गेले. किरणचा शोध घेत असलेले त्याचे मालक आणि भावाने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भद्रकाली पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > शेतकऱ्यांच्या लेकरांनी बनविले स्मार्ट मका पेरणीयंत्र!

हेही वाचा > बेपत्ता बांधकाम अभियंत्याचा मृतदेह गांधी तलावात!