CoronaUpdate : ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत जिल्ह्यात १०७ ने वाढ; बाधितांची संख्या १ हजारांपेक्षा कमी

number of active patients has increased by 107 in nashik news
number of active patients has increased by 107 in nashik news

नाशिक : सलग दोन दिवस पाचशेपेक्षा कमी कोरोनाबाधित आढळल्‍यानंतर मंगळवारी (ता. १३) देखील नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांची संख्या एक हजारांपेक्षा कमी राहिली. परंतु गेल्‍या सहा दिवसांपासून आढळणाऱ्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या अधिक होती. मात्र दिवसभरात ६०५ बाधित आढळले असताना ४८४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. तर, चौदा रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. त्यामुळे ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत १०७ ने वाढ झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात सात हजार ५९३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

मंगळवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ३३९, नाशिक ग्रामीणचे २५१, मालेगावचे ११, तर जिल्‍हाबाह्य चार रुग्ण आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील २९४, नाशिक ग्रामीणचे १६६, मालेगावचे १९, तर जिल्‍हाबाह्य पाच रुग्‍णांचा समावेश आहे. दिवसभरातील चौदा मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील सहा, नाशिक ग्रामीणचे सात, मालेगाव महापालिका हद्दीतील एका रुग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८६ हजार ६०९ झाली असून, यापैकी ७७ हजार ४६९ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झालेले आहेत. एक हजार ५४७ रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. दरम्‍यान, दिवसभरात आढळलेल्‍या संशयितांमध्ये नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ६६७, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १४०, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २०, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात नऊ, तर जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरा एक हजार २८२ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ७७६ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील आहेत. 

 
पोलिस कर्मचारी बंगारे यांचा मृत्‍यू 
शहर पोलिस दलातील देवळाली कॅम्‍प पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्‍या निवृत्ती बंगारे (वय ५७) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून कोरोनामुळे शहर पोलिस दलातील बळींची संख्या सात झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com