कोरोना पाठोपाठ शहरात डेंगीचा डंख; ऑक्टोबरमध्ये ५६, नोव्हेंबरमध्ये १६ रुग्ण 

dengue nashik
dengue nashik

नाशिक : कोरोनासंसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच आता डेंगीने शहरात तोंड वर काढले आहे. ऑक्टोबरमध्ये डेंगीचे ५६ रुग्ण आढळले, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात १६ रुग्ण आढळले आहेत. 

आठ महिन्यांपासून शहर कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला सामोरे जात आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाने रुग्णसंख्येचे विक्रम प्रस्थापित केल्यानंतर ऑक्टोबरमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचे दिसले. नोव्हेंबरमध्ये आठ महिन्यांतील नीचांकी कोरोना रुग्णांची संख्या बाहेर पडली. आता पारंपरिक डेंगी, स्वाइन फ्लू, मलेरिया रुग्णांकडे लक्ष वेधले जात आहे. १ जानेवारी ते २३ ऑक्टोबर या कालावधीत शहरात एक हजार १२४ रुग्ण आढळले. या वर्षी मात्र कोरोना झाकोळला गेला.

नोव्हेंबरमध्ये कोरोना नियंत्रणात येत असताना डेंगीने तोंड वर काढण्यास सुरवात केल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी जुलैत ४८, ऑगस्टमध्ये ११७, सप्टेंबरमध्ये १६५, ऑक्टोबरमध्ये २०७ डेंगीचे रुग्ण आढळले. या वर्षी जुलैत १४, ऑगस्टमध्ये २८, सप्टेंबरमध्ये ३९, तर ऑक्टोबरमध्ये ५६ रुग्ण आढळले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात १६ डेंगीचे रुग्ण आढळले. पावसाळ्यात घरांच्या गच्चीवर, फ्रीज, कुंड्या, निकामी टायर, नारळाच्या करवंट्यांमध्ये साचलेले पाणी स्वच्छ करण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com