जिल्ह्यात कोरोनाच्‍या बळींचा आकडा तेराशेपार; दिवसभरात नवे १ हजार ११० बाधित

number victims district over 13 hundred in nashik marathi news
number victims district over 13 hundred in nashik marathi news

नाशिक : जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूंच्‍या संख्येने तेराशेचा आकडा ओलांडला आहे. रविवारी (ता.२७) झालेल्‍या १९ मृत्‍यूंतून आतापर्यंत जिल्हयात कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍या रूग्‍णांची संख्या १ हजार ३१४ वर पोहोचली आहे. दिवसभरात १ हजार ११० नवीन कोरोना बाधित आढळून आले असून, कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांची संख्या १ हजार ३८३ राहिली. 

सर्वाधिक मृत्‍यू नाशिक महापालिका हद्दीत

गेल्‍या काही दिवसांत कोरोनामुळे होणार्या मृत्‍यूंची संख्या पंधराहून अधिक असल्‍याचे चित्र आहे. आतापर्यंत झालेल्‍या मृत्‍यूंमध्ये सर्वाधिक ७१६ मृत्‍यू नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. तर नाशिक ग्रामीणमधील ४१९ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. मालेगाव महापालिका हद्दीत १५१ तर जिल्‍हा बाह्य २८ रूग्‍णांनाही कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. 
रविवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७२६, नाशिक ग्रामीणचे ३३८, मालेगावचे ३९, तर जिल्‍हाबाह्य सात बाधित आढळून आले आहेत. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १ हजार १७५, नाशिक ग्रामीणचे १०८, मालेगावचे ७७ तर जिल्‍हाबाह्य २३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरातील १९ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील १२, नाशिक ग्रामीणचे सात रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यातून सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात ७ हजार ०३७ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ६४६, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९२, मालेगाव महापालिका रूग्‍णालय व गृहविलगीकरणात ३३, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात ३४ आणि जिल्‍हा रूग्‍णालयात १२ संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ६५९ अहवाल प्रलंबित होते. यापैकी १ हजार ०९१ अहवाल नाशिक ग्रामीणमधील रूग्‍णांचे आहे. ३६८ नाशिक शहर आणि दोनशे अहवाल मालेगाव परीसरातील रूग्‍णांचे आहेत. 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com