रोपवाटिकेमुळे शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध होणार - कृषिमंत्री दादा भुसे

प्रमोद सावंत
Sunday, 8 November 2020

महाराष्ट्र फलोत्पादनामध्ये अग्रेसर असुन मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. उत्पादीत होणाऱ्या मालाची निर्यातही मोठ्या प्रमाणत करण्यात येते.

नाशिक/मालेगाव : गेल्या 2 ते 3 वर्षापासून भाजीपाला पिकांचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुक्यात दर्जेदार तसेच किड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटीका उभारण्यास वाव आहे. यातून शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायांच्या संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. 

महाराष्ट्र फलोत्पादनामध्ये अग्रेसर असुन मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यावसायिक पध्दतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. उत्पादीत होणाऱ्या मालाची निर्यातही मोठ्या प्रमाणत करण्यात येते. याच उद्देशाने शासनामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना सुरु करण्यात येत आहे. सातमाने (ता. मालेगाव) येथील यशवंत ॲग्रो हायटेक नर्सरीचे भुमीपूजन प्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा >  समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, निवृत्त कर्नल अमित दळवी, दिलीप हिरे, लोटन शेवाळे, विनोद जाधव, प्रमोद निकम, निळकंठ निकम, दिपक देवरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.देवरे यांनी रोपवाटीका योजनेची माहिती दिली. भुसे यांच्या हस्ते रोपवाटीकेचे भुमीपूजन करण्यात आले. रोपवाटीकेच्या लाभार्थी लताबाई जाधव यांना रोपवाटीकेच्या पुर्वसंमती प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी कृषी कन्या निशा जाधव यांनी मनोगत व्यक्त करतांना ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्याची विनंती केली.

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nursery will provide opportunities for agribusiness says dada bhuse nashik marathi news