esakal | दिवाळीनंतरही तेलाचा भडका कायम; गृहिणींचा संताप
sakal

बोलून बातमी शोधा

cooking oil.jpg

ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंच्या दरात महागाईचा भडका वाढला होता. साधारणतः दिवाळी झाल्यावर १५ दिवस ते महिनाभर बाजारात मंदीचे वातावरण राहते. पण तेलाच्या भावात यंदा दिवाळीच्या आधी जी तेजी होती. त्यात आणखी पाच ते दहा रुपये लिटर रुपये वाढल्याने ग्राहकांचा अभाव असला तरी तेजी टिकून आहे. 

दिवाळीनंतरही तेलाचा भडका कायम; गृहिणींचा संताप

sakal_logo
By
नीलेश छाजेड

एकलहरे (जि.नाशिक) : ऐन दिवाळीत जीवनावश्यक वस्तूंच्या दरात महागाईचा भडका वाढला होता. साधारणतः दिवाळी झाल्यावर १५ दिवस ते महिनाभर बाजारात मंदीचे वातावरण राहते. पण तेलाच्या भावात यंदा दिवाळीच्या आधी जी तेजी होती. त्यात आणखी पाच ते दहा रुपये लिटर रुपये वाढल्याने ग्राहकांचा अभाव असला तरी तेजी टिकून आहे. 

दिवाळीनंतरही तेलाचा भडका कायम 
तेल वापरात जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताचा क्रमांक अग्रक्रमावर लागेल, रोजचा देशातील तेलाचा सरासरी वापर ६७५ लाख लिटर एवढा आहे. त्यामुळे तेलाची गरज तुर्कस्तान, युक्रेन, रशिया, मलेशिया, युरोप आदी देशांकडून आयात करून भागविली जाते. यंदा या देशांमध्ये सोयाबीन, सूर्यफुलाचे पीक कमी आल्याने तुटवडा निर्माण झाला आहे व त्याचा परिणाम तेलाच्या बाजारभावावर झालेला दिसून येत आहे. 

विदेशातील कमी उत्पादनामुळे भाववाढ 

तेल १ ली १५ली 
सोया ११०-११५/ १८००-१८३० 
सूर्य १२५-१३५/ १७८०-१९०० 
शेंगतेल१५०-१६५/ २४००-२४५० 
राईस १२०-१३५/ १८००-१९०० 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी


पाश्चिमात्य देशातून जेथून तेलाची आयात होते तिथेच यंदा उत्पादन कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. साधारणतः डिसेंबरपर्यंत ही तेजी अशीच राहील असे चिन्ह आहेत. -प्रशांत गोळेचा (किराणा व्यावसायिक) 
 

दिवसागणिक तेलाच्या दरातील भडका वाढतच चालला आहे. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी आपली गरज कशी भागवावी . गरिबाने तेला ऐवजी पाण्याची फोडणी द्यावी का? -अर्चना साळुंखे (गृहिणी) 
 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान