शंभरी पार करुनही मॅरेथॉन स्पर्धांत सहभाग! वयाच्या १०७ व्या वर्षी दगडू भामरेंची दौड खंडित

Oldest marathon runner Dagdu Bhamre dies in malegaon nashik marathi news
Oldest marathon runner Dagdu Bhamre dies in malegaon nashik marathi news

नाशिक : सध्याच्या काळात वयाच्या पन्नासी मध्येच लोक म्हातारे होतात. त्यांना असंख्य व्याधी जडतात आणि त्यांच्या हलचाली मर्यादीत होऊन जातात. याला काही जून्या हडाची माणसे अपवाद ठरतात. जर कोणी शंभरी पार केल्यानंतर मँरेथॉन धावत असेल तर त्यावर विश्वास बसणार नाही.

असाच एक अपवाद वयाची शंभरी पार करून देखील तरुणांसोबत मॅरेथॉन स्पर्धांत सहभागी होणारे लाडशाखीय आयडॉल दगडू भामरे (दिघावकर) यांची धाव बुधवारी (ता. २३) सायंकाळी सव्वासहाला वयाच्या १०७ व्या वर्षी खंडित झाली. वयाच्या १०३ वर्षात असताना २०१७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणारे ते सर्वात वयस्कर धावक होते.

अनेकांसाठी प्रेरणास्थान

असाच एक अपवाद म्हणजे दगडू भामरे. वयाच्या १०३ व्या वर्षी लोक धड चालू देखील शकणार नाहीत त्या वयात मॅरेथॉन सारख्या स्पर्धेत धावणे हे कित्येकांना प्रेरणा देणारे होते. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये शंभरी पार होऊन धावणारे दगडू भामरे सातत्याने सुदृढ आरोग्याचा संदेश देत असत. ते आकऊंटंट म्हणून रिटायर झाले होते. मालेगावचे रहिवासी असलेल्या भामरे यांनी त्यांच्या फिटनेसचे गुपीत हे त्यांचा पौष्टिक आहार आणि ठरलेले, निश्चित जिवणशैली असल्याचे सांगीतले होते. दरम्यान त्यांनी त्यांच्या शंभरी पार केल्यानंतर न थकाता धावण्यातून शेकडो तरुणांना प्रेरणा दिली.  नारायण भामरे (मालेगाव), प्रभाकर, मनोहर, विजय (नाशिक), भास्कर (पुणे), हेमंत भामरे (उल्हासनगर) यांचे ते वडील होत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com