वणी-कळवण रस्त्यावर भीषण अपघात; १ जण जागीच ठार तर १२ जखमी

दिगंबर पाटोळे
Friday, 30 October 2020

वर्णी-नांदुरी मार्गावर पायरपाडा जवळील गोदाई हॉटेल जवळ दोन्हीही वाहनांची समोरासमोर धडक झाली. जखमी पैकी काहीना वर्णी येथे प्राथमीक उपचार करुन नाशिक येथे हलविण्यात आले. तर काहींवर वणी येथे उपचार सुरु आहे.

नाशिक/वणी : वणी- नांदुरी मार्गावर पायरपाडा नजीक स्विफ्ट व टीयुव्ही कारची धडक होऊन १ जागीच ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर वणी रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिकला हलविण्यात आले.

आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास याबाबत स्विफ्ट कार क्रमांक एमएच 42 एएच 4012 नाशिकहुन कळवण येथे जात होती तर टियुव्ही कार क्रमांक एम एच 15 जीएक्स 3883 ही नांदुरीहुन नाशिक येथे जात असतांना वर्णी-नांदुरी मार्गावर पायरपाडा जवळील गोदाई हॉटेल जवळ दोन्हीही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

यात अपघातात स्वीफ्ट मधील योगेश शांताराम शेवाळे (वय ४२), रा. मोकभंगी ता. कळवण हे ठार झाले तर सोनाली योगेश शेवाळे (वय ३५), भिमाबाई शांताराम शेवाळे (वय ६५), सिद्दार्थ योगेश शेवाळे (वय १४), प्राची योगेश शेवाळे (वय ९), रा. मोकभनगी जखमी झाले आहे. तर टियुव्ही मधील सुमित नानाजी बच्छाव (वय २५), योगेश रामनाथ बुराडे (वय ३४), सुप्रिया योगेश बुराडे (वय २९), स्वानंदी योगेश बुराडे (वय २.५ वर्षे), अथर्व मधुकर सहाणे, (वय १४), नचिकेत योगेश बुराडे (वय ५), ओमकार महाले (वय २४) सर्व रा. नाशिक हे जखमी झाले आहे. जखमी पैकी काहीना वर्णी येथे प्राथमीक उपचार करुन नाशिक येथे हलविण्यात आले. तर काहींवर वणी येथे उपचार सुरु आहे.

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one killed 12 injured road accident at wani kalwan road nashik marathi news