esakal | चिंताजनक बातमी! मालेगावात डॉक्टर महिलेसह दोन कोरोना बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona suicide.jpg

कुंभारवाडा भागातील वृध्द डॉक्टर भाऊ-बहिणींवर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मधुमेह देखील होता. डॉक्टर महिलेचा अहवाल यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज (ता.२०) पहाटे या महिलेचा मृत्यु झाला. आणि त्याच पाठोपाठ... 

चिंताजनक बातमी! मालेगावात डॉक्टर महिलेसह दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित कुंभारवाडा भागातील 64 वर्षीय डॉक्टर महिलेसह, संशयीत असलेल्या मुस्लीमनगर भागातील 55 वर्षीय पुरूषाचा सोमवारी (ता. 20) म्रुत्यु झाला. सलग तीन दिवसापासून रोज दोन जणांच्या म्रुत्युने शहरात खळबळ उडाली आहे. एकूण रूग्णांची संख्या 85 झाली असून, म्रुतांची संख्या आठ झाली आहे. 

डॉक्टर महिलेचा अहवाल यापूर्वीच कोरोना पाँझिटिव्ह 
मालेगाव येथील कुंभारवाडा भागातील वृध्द डॉक्टर भाऊ-बहिणींवर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मधुमेह देखील आहे. डॉक्टर महिलेचा अहवाल यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आज (ता.२०) पहाटे या महिलेचा मृत्यु झाला. पाठोपाठ आज दुपारी जीवन हॉस्पीटल मध्ये उपचार सुरू असलेल्या 55 वर्षीय संशयिताचा मृत्यु झाल्याचे जीवन हाँस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेज फैजी यांनी सांगीतले. सत्तर कोरोनाबाधितांवर सामान्य, जीवन व मन्सुरा युनानी महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?

पन्नासपेक्षा अधिक जणांना क्वारंटाईन

रविवारी (ता.१९) रात्री आठ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या रूग्णांशी संबधित नातेवाईक व संपर्कात आलेल्या पन्नासपेक्षा अधिक जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.18) 33 वर्षीय तरुणाचा तर सामान्य रुग्णालयात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा > GOOD NEWS : कोरोनापासून बचाव करणाऱ्या 'सुरक्षाकवच'ची होतेय नाशिकमध्ये निर्मिती...पाहा हा व्हिडिओ