Coronaupdate : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६ हजार ४९० वर; तर 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त

अरुण मलाणी
Monday, 31 August 2020

दिवसभरात सहा बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यूची नोंद झाली आहे. यात नाशिक शहरातील एक, नाशिक ग्रामीणचे तीन, तर मालेगाव येथील दोन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्या संख्येत ६३० ने वाढ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (ता. ३०) दिवसभरात एक हजार १७० कोरोनाबाधित आढळून आले असून, जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा ३६ हजार ४९० झाला आहे. दिवसभरात ५३४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या २८ हजार ५१२ झाली आहे.

दिवसभरात एक हजार १७० नवीन रुग्‍ण

रविवारी (ता. 30) दिवसभरात सहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याने मृतांचा आकडा ८६२ वर पोचला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्‍या संख्येत ६३० ने वाढ झाली असून, जिल्ह्यात सध्या सात हजार ११६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ७९७, नाशिक ग्रामीणचे ३३०, मालेगावचे ४२, तर जिल्हाबाह्य एका रुग्‍णाचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ४३४, नाशिक ग्रामीणचे ५०, तर मालेगावच्‍या ५० रुग्‍णांचा समावेश आहे. दिवसभरात सहा बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यूची नोंद झाली आहे. यात नाशिक शहरातील एक, नाशिक ग्रामीणचे तीन, तर मालेगाव येथील दोन रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्या संख्येत ६३० ने वाढ झाली आहे. 

हेही वाचा > गंभीर! १५ वर्षीय मुलीची बापा विरोधात तक्रार; वेळीच वाचा फोडली म्हणून प्रकार उजेडात

नाशिक शहरात चार हजार १८४, नाशिक ग्रामीण दोन हजार २८२, मालेगाव ६४३, जिल्‍हाबाह्य सात कोरोनाबाधितांवर सध्या उपचार केले जात आहेत. 
सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ४१ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ८०२, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात १३६, मालेगाव महापालिका व गृहविलगीकरणात ३४, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय २१, तर जिल्‍हा रुग्‍णालयात दोन संशयित दाखल झाले आहेत.  

हेही वाचा > एकीकडे गौराईनिमित्त स्त्रीशक्तीचा जागर; दुसरीकडे 'ती'च नकोशी? चिमुरड्या जीवाला शिक्षा कशासाठी?

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand 170 new patients in the district on Sunday nashik marathi news