अंगाला लागणारी हळदच रुसली! जनार्दनचे लग्नाचे स्वप्न अधुरेच; काकाच्या दशक्रियेलाच पुतण्याची अंत्ययात्रा

janardan.jpg
janardan.jpg

नांदगाव (नाशिक) : काकाच्या दशक्रियेवरुन परस्पर कामावर निघालेल्या पुतण्यावर काळाचा घाला. कुटुंब एका दुख:तून सावरत असतांनाच घडली दुसरी घटना. घडलेल्या प्रकाराने परिसरात भयाण शांतता. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

घरी लग्नाची बोलणी सुरु होती. फेब्रुवारी महिन्यात लग्नाची तारीखही ठरली. मात्र बोहल्यावर चढण्याचे स्वप्न बघणाऱ्या जनार्दनवर नियतीने असा वार केला की सारं काही संपलं. दुचाकी क्र. १५/एफ के ६०६१ वर प्रवास करणारे जनार्दन सावळीराम वाघीरे (२२, रा.डॉक्टरवाडी, ता नांदगांव) व अंकुश भागीनाथ डोळे (२५, जतपुरा ता.नांदगाव) हे दोघे मावसभाऊ सर्पदंशाने मयत झालेल्या काकांच्या दशक्रियेला डॉक्टरवाडी येथे आले होते. दशक्रिया विधी आटोपून ते दोघे निफाड साखर कारखान्यावर कामाला जायला निघाले. मात्र नांदगाव - मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावरुन जात असतांनाच टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात जनार्दन हा जागीच ठार झाला, तर अंकुश गंभीर जखमी झाला. जनार्दनवर शुक्रवारी (ता. 8) रात्री उशिरा त्याच्यावर डॉक्टरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तो रस्ता ठरतोय ‘ब्लॅक स्पॉट'

नाशिक येथून आठ किलोमीटरवरील हिसवळ बुद्रुक नजीकचा वळण रस्ता आता वाहतुकीसाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरला आहे. रस्त्याचा दर्जा राखतांना धोकादायक वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारची सतर्कता बाळगली नसल्याने याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू याठिकाणी झाला आहे. याच रस्त्यावर टँकरच्या धडकेत १७ दिवसांत दोघांना जीव गमवावा लागला असून, तीन जणांना अपंगत्व आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com