lasalgaon onion 456.jpg
lasalgaon onion 456.jpg

सलग तिसऱ्या दिवशी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प; बळीराजा विवंचनेत

लासलगाव ( नाशिक ) :  सलग तिसऱ्या दिवशी लासलगावसह जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प आहेत. कांदा लिलाव होत नसल्याने करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झालीय, केंद्राने व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने २ दिवसापासून बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद आहे. लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होतेय. सहाय्यक निबंधकांनी व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत

सलग तिसऱ्या दिवशी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ठप्प

आजही (ता.२८) लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा आवकेमुळे लिलाव झाले नाही. निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे यांनी बोलावलेल्या बैठकीला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद न देता बाजार समितीचे लिलाव सुरू केले नाही.नेमके कोण कोणाला पाठीशी घालत आहे? याच विवंचनेत बळीराजा आहे. 
 

उपसमिती असलेल्या विंचुर बाजार समितीमध्ये मात्र लिलाव सुरू

लासलगाव बाजार समितीची उपसमिती असलेले विंचुर बाजार समितीमध्ये मात्र बुधवारी कांद्याचे लिलाव सुरू झाले. बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त 5800 कमीत कमी 1800रु  व सरासरी भाव 4500 रुपये मिळाला. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याचे बाजार भाव असलेले लासलगाव मात्र आजही लिलाव सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com