रेल्वेच्या भुसावळ मंडळातून बांगलादेशसाठी कांदा रवाना...पहिल्यांदाच पाठवला २०व्हीपी पार्सल गाडीद्वारे कांदा 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 23 July 2020

मध्य रेल्वे कोरोना काळात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सुविधा देण्याच्या हेतूने वाणिज्य आणि परिचालन विभागाकडून व्यापाऱ्यांसोबत वेळोवेळी संयुक्त बैठका घेत विशेष पार्सलद्वारे उत्पादन इच्छितस्थळी पाठवले जात आहेत.

नाशिक रोड : मध्य रेल्वे कोरोना काळात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सुविधा देण्याच्या हेतूने वाणिज्य आणि परिचालन विभागाकडून व्यापाऱ्यांसोबत वेळोवेळी संयुक्त बैठका घेत विशेष पार्सलद्वारे उत्पादन इच्छितस्थळी पाठवले जात आहेत. दरम्यान, बुधवारी (ता. २२) २० डब्यांच्या विशेष पार्सल गाडीद्वारे बांगलादेशसाठी कांदा पाठविण्यात आला. भुसावळ मंडळच्या लासलगाव स्थानकावरून पहिल्यांदाच २०व्हीपी पार्सल गाडीद्वारे कांदा हा दरशना स्थानक (बांगलादेश) या ठिकाणी पाठविण्यात आला असल्याची माहिरी रेल्वे विभागाकडून देण्यात आली. 

हेही वाचा >नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

 यापूर्वी प्रवासी रेल्वे गाड्यांना पार्सल बोगी जोडत भाजीपाला,फळे आणि इतर मालाची वाहतूक होत असत. आता प्रथमच रेल्वे स्थानकातुन पार्सल व्हेनच्या माध्यमातून कांदा बांगलादेश साठी रवाना करण्यात येत आहे. २० पार्सल व्हॅनच्या माध्यमातून ४८० मेट्रिक टन कांदा बांगलादेशमधील दर्शना येथे जाण्यासाठी मध्यरेल्वेच्या लासलगाव रेल्वे स्थानकातुन कांदा लोडींगचे काम सुरू आहे. कांदा पार्सल व्हॅनमध्ये लोड केला जात असल्याने येणार्या दिवसात अशी निर्यात सुरू राहिल्यास कोसळणाऱ्या कांद्याचे भावात सुधारणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा > धक्कादायक! 'त्या' क्षणाला न बायको आठवली न लेकरं...दुर्देवी घटना

रिपोर्टर - हर्षवर्धन बोऱ्हाडे 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion left for Bangladesh from Bhusawal Board of Railways nashik marathi news