लासलगावत कांद्याच्या दरात तेराशे रुपयांची घसरण; घाऊक बाजारात कांदा ८० रुपये किलोवर

Onion prices
Onion prices

नाशिक/लासलगाव : कांद्याचे भाव वाढत असताना बुधवारी (ता. २१) मात्र कांद्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची घसरण झाली. लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू होताच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एक हजार ३०० रुपयांचा कमी भाव कांद्याला मिळाला. कांद्याला जास्तीत जास्त सात हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याची खालवलेली प्रतवारी विक्रीसाठी येत असल्याने बाजारभावात घसरण पाहायला मिळाली.

सरासरी पाच हजार ८०० रुपये, तर कमीत कमी एक हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव लासलगाव बाजार समितीमध्ये मिळाला. कांदा घाऊक बाजारात ८० रुपये किलोवर पोचला आहे. कांद्याच्या भावात होणारी वाढ कायम आहे. परदेशी, कमी भावाचा कांदा बाजारात असूनही देशी कांद्याची भाववाढ सुरूच आहे. येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर ६७१ वाहनांतून कांदा आठ हजार ३०० क्विंटल आवक झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com