कांदा दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडे! 

एस. डी. आहिरे
Wednesday, 21 October 2020

महाराष्ट्रासह राज्यस्थानच्या लाल कांद्याचे पीक पावसाने उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील नाशिक व नगर जिल्ह्यांवर कांद्यावर देशाची भिस्त आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर लाल कांद्याने गजबजणारे बाजार समिती आवार अजून ओस पडली आहेत.

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : चार महिन्यांपूर्वी दराअभावी रडविणारा कांदा दहा हजार रुपये प्रतिक्विंटलकडे निघाल्याने उत्पादकांना हसवू लागला आहे. दिवाळीपूर्वीच कांदा दहा हजार रुपयांचा निर्णायक टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर शनिवार (ता. १७)च्या तुलनेत सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटलने वधारले. 

कांदा दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडे
महाराष्ट्रासह राज्यस्थानच्या लाल कांद्याचे पीक पावसाने उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील नाशिक व नगर जिल्ह्यांवर कांद्यावर देशाची भिस्त आहे. ऑक्टोबरच्या मध्यावर लाल कांद्याने गजबजणारे बाजार समिती आवार अजून ओस पडली आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, उमराणे आदी बाजार समित्यांत ४० हजार क्विंटल उन्हाळ कांदा, तर पाच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमाल सात हजार ९७१, सरासरी सहा हजार ७७५, तर किमान तीन हजार ५०० रुपये दर मिळाला. लाल कांद्याने कमाल सहा हजार २०१, सरासरी चार हजार ५००, तर किमान दोन हजार एक रुपये भाव खाल्ला. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

दोन महिने उन्हाळ कांद्यावर विसंबून
नवा कांदा येण्यास जानेवारी महिना उजाडणार आहे. उन्हाळ कांदा संपल्यात जमा आहे. त्यामुळे पुढील दोन महिने उन्हाळ कांद्यावर विसंबून रहावे लागणार आहे. सध्या देशभरात दररोज ५० हजार टन कांदा खाल्ला जातो. तर दररोजची आवक मात्र देशभरात ३० हजार टन विक्रीसाठी येत आहे. मागणी व पुरवठ्याची ही तफावत येत्या महिन्यात अधिक वाढणार असल्याने कांद्याचे दर वाढणार आहेत. केंद्र शासनाने निर्यातबंदीच्या जोखंडात कांद्याला अडकविले; पण घटलेल्या आवकेने कांद्याच्या दराची भरारी थांबली नाही. 
 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

कांद्याच्या दराचे धोरण हे कालबाह्य झाले आहे. निर्यातीवर कांद्याच्या दराचे धोरण असू नये. ग्राहक व शेतकरी दोघांशी सुसंगत भूमिका केंद्र शासनाने घेण्याची गरज आहे. -नानासाहेब पाटील (संचालक, नाफेड) 

निर्यातबंदी करून केंद्र शासनाने शेतकरीविरोधी भूमिका पुन्हा एकदा घेतली. आयातीचे धोरण स्वीकारू नये एवढी अपेक्षा. -पंडित गावडे (शेतकरी, विंचूर) 

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होण्याची चिन्ह असल्याने दर दहा हजारांपर्यंत लवकरच पोचतील. लाल कांद्याची आवक मुबलक प्रमाणात होईपर्यंत दर कमी होणार नाही. -दिनेश बागरेचा (कांदा व्यापारी)  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices go up to ten thousand nashik marathi news