येवल्यात पावसाचाही आता सम-विषम फॉर्मूला...बळीराजाची वाढली चिंता!

संतोष विंचू
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

रोजच्या येणाऱ्या पावसाने तर अंदरसुल, धामणगाव, भारम, डोंगरगाव आदी भागात बाजरी, मकाचे पीक जमीनदोस्त होत आहे. जमिनी उपळू लागल्या असून कांदा लागवडीसाठी घेतलेले रोपे कुठे वाहिले तर कुठे पिवळे पडून खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

नाशिक : (येवला) डोंगराळी दुष्काळी अवर्षणप्रवण अशी बिरुदे लागलेल्या तालुक्याच्या पूर्व भागात मात्र यंदा पावसाने करत चालवला आहे. आठवड्यापासून रोज येणार्‍या पावसाने दहा-पंधरा गावांच्या परिसरात पिकांचे नुकसान होत आहे. पहिल्या टप्प्यात कांद्याची रोपे पिवळी पडून खराब होत आहे. अनेक ठिकाणी जमिनीही उपया असून मका इतर पिके ही भुईसपाट होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

कुठे धो-धो तर कुठे गरजेपुरत्या पावसाने तालुक्यात सम-विषम फार्मूला जपला आहे. त्याचवेळी पश्चिम पट्ट्यात चिंचोडी, जळगाव नेउर, महालखेडा आदी भागात शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. अर्थात पाऊस कमी अधिक असला तरी वेळेतच पडल्याने सर्वत्र पिके मात्र जोमात आहेत. तालुका भौगोलिकदृष्ट्या दोन भागात विभागाला असून उत्तर-पुर्व भाग हा अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्टा आहे. या भागात नेहमीच पावसाची अवकृपा असते. यंदा सुरुवातीला पूर्व भागात जोरदार पाऊस पडला असून भारम, डोंगरगाव, कोळम, खरवंडी या भागात धो-धो पडणारा पावासाने पिकांचे नुकसान चालवले आहे. रोजच्या येणाऱ्या पावसाने तर अंदरसुल, धामणगाव, भारम, डोंगरगाव आदी भागात बाजरी, मकाचे पीक जमीनदोस्त होत आहे. जमिनी उपळू लागल्या असून कांदा लागवडीसाठी घेतलेले रोपे कुठे वाहिले तर कुठे पिवळे पडून खराब होऊ लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

अंदरसूलला विक्रमी पाऊस..

या महिन्यात सुरुवातीला दडी मारलेल्या पावसाने ३ जुलैनंतर थेट ११ व १२ व त्यानंतर १५ जूलैला आलेला पाऊस बेपत्ता झाला होता. तो २२ तारखेपासून पुन्हा सक्रीय झाला असून पूर्व भागात रोजच दर्शन देत आहेत. अंदरसुल भागात सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. त्याखालोखाल येवला परिसर व सुरुवातीला रुसलेल्या पश्चिमेकडील थोड्या परिसरात पाऊस आहे. मात्र सावरगाव, पाटोदा, नगरसुल हा भाग अद्यापही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. येवला मंडळात ३७९ मिमी, अंदरसुलला ४५८ मिमी, नगरसूलला सर्वात कमी २१५ मिमी तर पाटोदयात २८३ मिमी, सावरगावला २३७ मिमी व जळगाव नेऊरला २३९ मिमी पाऊस पडल्याची माहिती तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिली.

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

तालुक्याच्या पश्चिम भागात यावर्षी पिकांना वाढीच्या योग्य पाऊस होत असला तरी आता खरीप पिके मोठी झाल्याने पिकांची त्यांची भूक वाढली आहे. या परिसरामध्ये मोठ्या पावसाची गरज निर्माण झाली आहे. अद्याप विहिरी बंधारे कोरडेठाक आहे. - बाळासाहेब मढवई, शेतकरी, चिचोंडी बुद्रुक

१० ते १२ दिवसांपासून रोज पाऊस पडत असल्याने कांदा रोपे पिवळे पडून सडत आहे. मकासह बाजरीचे पिके पडत असून जमिनी ओल धरत असल्याने पिके सडण्याची भीती आहे. पिके वाचण्यासाठी पूर्व भागात पावसाच्या उघडीपची गरज आहे. - नंदूआबा सोमासे, प्रगतशील शेतकरी, वाघाळे

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion seedlings damaged due to daily rains, farmers worried nashik marathi news