निराश नाही झाले..गावाकडे नाही परतले...तर इथेच मिळवला हक्काचा रोजगार!

दीपक आहेर : सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 5 May 2020

देशभरातील कष्टकरी लॉकडाऊन मध्ये मिळेल त्या पर्यायाने प्रसंगी जिव धोक्‍यात घालून घराकडे परतत आहेत. अशा परिस्थतीदेखील नंदुरबार जिल्ह्यातून येथे मजुरीसाठी आलेल्या कुटुंबीयाने गावाकडे न परतता कामात बदल करीत जगण्याची धडपड सुरु ठेवली आहे.प्रतीकुल परिस्थीतही ते शासनाच्या कोणत्याही मदतीवर अवलंबुन राहीले नाहीत.शेतीकामाचा अनुभव नसतांना त्यांनी कांदा काढणीचे काम शिकुन घेत हक्काचा रोजगार मिळवला आहे. 

नाशिक / निवाणे : देशभरातील कष्टकरी लॉकडाऊन मध्ये मिळेल त्या पर्यायाने प्रसंगी जिव धोक्‍यात घालून घराकडे परतत आहेत. अशा परिस्थतीदेखील नंदुरबार जिल्ह्यातून येथे मजुरीसाठी आलेल्या कुटुंबीयाने गावाकडे न परतता कामात बदल करीत जगण्याची धडपड सुरु ठेवली आहे.प्रतीकुल परिस्थीतही ते शासनाच्या कोणत्याही मदतीवर अवलंबुन राहीले नाहीत.शेतीकामाचा अनुभव नसतांना त्यांनी कांदा काढणीचे काम शिकुन घेत हक्काचा रोजगार मिळवला आहे. 

निराश नाही झाले..गावाकडे नाही परतले..!

निवाणे शिवफाटा येथे दगड फोडून खडी टाकून रस्ताचे काम करणारे मजुर कुटुंब बारा ते पंधरा महिला व लहान मुलांसोबत नंदुरबार जिल्ह्यातून डिसेंबरपासुन मजुरीसाठी आले आहेत. गावाबाहेर ताडपत्रीच्या झोपड्यांमध्ये त्यांचे वास्त्वय असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रस्त्यांची कामे बंद झाल्याने रोजगार गेल्याने पोटाचा प्रश्न निर्माण झाला. लॉकडाऊन मुळे घराकडे परतण्यासाठी वाहतूकही बंद झाली. त्यानंतरही हे सर्व मजूर आपापल्या झोपड्यांत थांबुन शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत राहिले. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने जवळ असलेले पैसे संपून अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला. या मजुरांनी प्रशासन किंवा कोणाकडेही हात न पसरवता मिळेल त्या कामाची शोधाशोध सुरु केली.

दगड फोडणाऱ्या हातांनी भरली कांदाचाळ 

आजूबाजूला शेतात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा काढणीचे व कांदा चाळीत साठवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग चालू होती. पण शेत मजुरीचा अनुभव व विळा, खुरपे साधने नसल्याने शेतात काम करण्यास हिमत होईना. त्यातच निवाणे येथिल पंडित आहेर, कौतिकराव आहेर या शेतकऱ्यांनी पुढे येत या नंदुरबारच्या कुटुंबियांना कांदा काढणीचे काम शिकवत औजारे व काम उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना टंचाईत मजूर मिळाले आणि दिलीप पवार,प्रेमा पवार,सुरेश पवार,कालूसिंग पवार,अनिता पवार,अरुणा पवार,कण्याबाई पवार आदींना पोटापाण्यासाठी मजुरीही मिळाली. 

 हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा

घराकडे जाता न आल्याने अडचणीत आलो

दगड फोडून खडी रस्ता करायचे काम आम्हीं करतो पण लॉकडाऊन मुळे रस्ता कंत्राट बंद झाले. घराकडे जाता न आल्याने अडचणीत आलो. शासन फक्त नावे नोंदणी करून गेले. कोरोनाच्या काळात शेत मजुरीमुळे पोट भरू शकलो. -दिलीप पवार (स्थलांतरित मजूर) 

हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onions filled with stone-breaking hands workers nashik marathi news