लासलगाव येथे कांद्याच्या दरात घसरण; खालवलेली प्रतवारी विक्रीस आल्याचा परिणाम

अरुण खंगाळ
Thursday, 22 October 2020

कांदा घाऊक बाजारात ८० रुपये किलोवर पोचला आहे. कांद्याच्या भावात होणारी वाढ कायम आहे. परदेशी, कमी भावाचा कांदा बाजारात असूनही देशी कांद्याची भाववाढ सुरूच आहे.

लासलगाव (जि.नाशिक) : कांद्याचे भाव वाढत असताना बुधवारी (ता. २१) मात्र कांद्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची घसरण झाली. लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू होताच मंगळवारच्या तुलनेत बुधवारी एक हजार ३०० रुपयांचा कमी भाव कांद्याला मिळाला.

खालवलेली प्रतवारी विक्रीस आल्याचा परिणाम

कांद्याला जास्तीत जास्त सात हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याची खालवलेली प्रतवारी विक्रीसाठी येत असल्याने बाजारभावात घसरण पाहायला मिळाली. सरासरी पाच हजार ८०० रुपये, तर कमीत कमी एक हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव लासलगाव बाजार समितीमध्ये मिळाला. कांदा घाऊक बाजारात ८० रुपये किलोवर पोचला आहे. कांद्याच्या भावात होणारी वाढ कायम आहे. परदेशी, कमी भावाचा कांदा बाजारात असूनही देशी कांद्याची भाववाढ सुरूच आहे. येथील बाजार समितीच्या मुख्य आवारावर ६७१ वाहनांतून कांदा आठ हजार ३०० क्विंटल आवक झाली.  

हेही वाचा > "खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढणार" - छगन भुजबळ

हेही वाचा > रहाडी, खरवंडीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोऱ्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onions at Lasalgaon drop in price nashik mararhi news