कॅलिफोर्नियातील पती आणि नाशिकमधील पत्नीमध्ये ऑनलाइन फारकत; सहमतीने घटस्फोट मंजूर

विनोद बेदरकर
Saturday, 19 September 2020

 कॅलिफोर्नियातील पती आणि नाशिकमधील पत्नी यांच्यात सामोपचाराने कुटुंब न्यायालयात ऑनलाइन कामकाजात फारकत झाली. येथील युवक विवाहानंतर नोकरीसाठी कॅलिफोर्नियात पत्नीसह गेला होता. त्यानंतर...

नाशिक : कॅलिफोर्नियातील पती आणि नाशिकमधील पत्नी यांच्यात सामोपचाराने कुटुंब न्यायालयात ऑनलाइन कामकाजात फारकत झाली. येथील युवक विवाहानंतर नोकरीसाठी कॅलिफोर्नियात पत्नीसह गेला होता. त्यानंतर...

कुटुंब न्यायालयात ऑनलाइन फारकत 

विवाहानंतर कॅलिफोर्नियामध्ये राहायला गेलेल्या दोघांत वाद झाल्याने पत्नी भारतात परतली. त्यानंतर तिने पुन्हा पतीकडे अमेरिकेत जाण्यासाठी नकार दिला व घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. पतीने कॅलिफोर्नियातून वकील ॲड. धर्मेंद्र चव्हाण यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला. पती-पत्नीत आपापसांत समझोता होऊन घटस्फोटाचा निर्णय झाला. तो अमेरिकेतून येऊ शकत नसल्याने त्याने तेथून प्रतिज्ञापत्र सादर केले. त्याच्या वडिलांनी मुखत्यारपत्र दिले. न्यायालयाने ऑनलाइन सुनावणी घेत सहमतीने घटस्फोट मंजूर केला. पत्नीच्या वतीने ॲड. श्याम गोसावी, ॲड. दिनेश शिंदे यांनी कामकाज पाहिले. 

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online court divorce separation nashik marathi news