कॅशबॅकचे आमिष दाखवून पन्नास हजारांना गंडा 

fraud-awareness
fraud-awareness

नाशिक : मालेगाव येथे एका व्यक्तीला संशयिताने कॅशबॅकचे आमिष दाखवून गोपनीय माहितीच्या आधारे सुमारे 50 हजारांना गंडा घातला होता; परंतु फसवणूक झालेल्या व्यक्तीने तत्काळ ग्रामीण सायबर पोलिसांत धाव घेतली. सायबर पोलिसांनी केलेल्या तांत्रिक पद्धतीने संशयिताचे व्यवहार रोखल्यामुळे संबंधिताला 50 पैकी 24 हजारांची रक्कम परत मिळाली. 

वेळीच तक्रार दाखल; 24 हजार परत
25 डिसेंबर 2019 ला फसवणूक झालेल्या व्यक्तीला अज्ञात संशयिताने फोन केला आणि ई-वॉलेटद्वारे आर्थिक व्यवहार केल्यास चार हजार 999 रुपयांची कॅशबॅक मिळेल असे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडत त्याने संशयिताने पाठविलेल्या लिंकवर आवश्‍यक माहिती भरली. त्यानंतर संशयिताने त्याच माहितीच्या आधारे व्यक्तीच्या बॅंक खात्यातून 49 हजार 991 रुपये ऑनलाइन वर्ग केले. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यक्तीने नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार, सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी, मिळालेल्या माहितीनुसार तांत्रिक विश्‍लेषण करून विभागाच्या मदतीने गुन्ह्याचा तपास सुरू केला. बॅंक अधिकाऱ्यांच्या मदतीने वर्ग होणाऱ्या पैशांचा व्यवहार थांबविला. त्यामुळे वर्ग झालेल्या पैशांपैकी 24 हजार 184 रुपयांची रक्कम रोखण्यात सायबर पोलिस शाखेला यश आले. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू आहे. फसगत झालेल्या व्यक्तीने ग्रामीण सायबर पोलिसांचे आभार मानत, त्यानेही ऑनलाइन व्यवहार करताना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. 

कोट 
आर्थिक व्यवहारासंदर्भात अज्ञातांकडून आलेल्या फोनवर विश्‍वास ठेवू नये. आर्थिक व्यवहार करताना मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही देऊ नये. कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नये. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क साधल्यास फायदा होऊ शकतो. 
-डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com