'महामानवाचा जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका' - भुजबळ

chhagan bhujbal
chhagan bhujbal

नाशिक/येवला : येवल्याच्या मुक्ती भूमीवरील धर्मांतर घोषणेची क्रांती परिवर्तन घडवणारी आहे. यामुळे आजची येथे धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यांच्या विचारांची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका. असा संदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाइन मुक्ती महोत्सवात दिला. 

ऑनलाइन मुक्ती महोत्सव

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी येथे केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेचा ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोनामुळे तीन दिवसीय यू ट्यूब ऑनलाइन मुक्ती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी आपल्या ऑनलाइन व्हिडिओ संदेशातून मार्गदर्शन केले. मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून महोत्सव व वर्धापनदिन ग्लोबल पद्धतीने साजरा करण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष बुरंगे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी सभापती प्रकाश वाघ होते. रोज दुपारी विविध प्रकारच्या व्याख्यान, परिसंवाद वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रमातून लोक जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

धर्मांतरित बौद्ध व भारताची जनगणना २०२१ या विषयवार माजी न्यायाधीश ॲड . अनिल वैद्य यांचे जाहीर व्याख्यान झाले. धर्मांतरित बौद्धांनी आपले प्रश्न नीट समजून घेऊन सांघिक लढा उभारावा असे प्रतिपादन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी चंद्रकांत गायकवाड होते. धम्म व संविधान चळवळ महिलांनी हाती घ्यावी या विषयावर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी तथागत बुद्धाच्या धम्मात चारित्र्य तथा शीलाला अनन्य साधारण महत्त्व असून मानवी जीवनात शिलाचरणा शिवाय उन्नती होत नसल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानी प्रा.सुवर्णा पगारे होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता व आजची समाज माध्यम याविषयी ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी आपले उद्बोधक विचार मांडले. अध्यक्षस्थानी पत्रकार कुमार कांबळे (कोल्हापूर) होते. ऑनलाइन मुक्ती महोत्सवाचा समारोप आंबेडकरवारी गझल संमेलनाने झाला. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवारी गझलकार भागवत बनसोडे अध्यक्षस्थानी होते. प्रसिद्ध आंबेडकरवादी गझलकार सुनील ओवाळ (मुंबई),सूर्यकांत मुनघाटे (नागपूर),अण्णा त्रिभुवन (वाशी), सचिन साताळकर (येवला), अत्ताम गेंदे (परभणी), प्रीती जमधडे (चिमूर), छाया सोनवणे (जळगांव), संदीप वाकोडे (अकोला) यांनी आपल्या सामाजिक प्रबोधनाच्या 

आंबेडकरवादी गझला सादर केल्या. मुक्ती महोत्सवाचे प्रवर्तक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन व आभार मिलिंद गुंजाळ यांनी मानले. 
मिलिंद पगारे, सुरेश खळे, सुभाष गांगुर्डे, अशोक पगारे, अमित बनकर, अमीन शेख, शैलेंद्र वाघ, राजरत्न वाहुळ, विश्वास जाधव, मयूर सोनवणे, जितेश पगारे,राहुल गुंजाळ,आशा आहेर, वंदना नागपुरे, सविता धिवर, सुभाष वाघेरे, बाबासाहेब गोविंद, गौरव थोरात, गौरव साबळे, करुणा अहिरे, घोडेराव गुरुजी, अभिमन्यू शिरसाठ, बी.पी.खैरनार, विनोद त्रिभुवन आदींनी संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com