कोरोनामुळे अनेक वर्षांची परंपरा खंडित; भालेकर मैदानावर यंदा एकच गणपती

Only one Ganpati on Bhalekar Maidan this year nashik marathi news
Only one Ganpati on Bhalekar Maidan this year nashik marathi news

नाशिक/जुने नाशिक : बी. डी. भालेकर मैदानावर शहरातील प्रमुख मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो. मंडळांनी उभारलेली आरास, देखावे बघण्यासाठी शहर-जिल्ह्यातून भाविक येतात. कोरोनामुळे यंदा अनेक वर्षांची उत्सव साजरा करण्याची परंपरा खंडित होणार आहे. कोरोनामुळे सर्व मंडळांनी साध्या पद्धतीने एकच गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वांचा एकच गणपती

शहरातील राजे छत्रपती, एचएएल, नरहरी राजा, मायको, महिंद्र, महिंद्र सोना, मूकबधिर संघ कंपन्यांच्या या मंडळांतर्फे बी. डी. भालेकर मैदानावर जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. ही मंडळे वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितींचे देखावे तयार करतात. मात्र, कोरोनाचे मोठे संकट आल्याने मंडळांनी यंदा सर्वांनी मिळून एकच गणपती बसविण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. लहान मंडपात एका गणेशमूर्तीची स्थापना केली जाणार आहे. कोणताही देखावा, रोषणाई, ध्वनिक्षेपकांचा गाजावाजा नसेल. एकाच बॅनरखाली उत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी गणेश बर्वे आणि पद्माकर गावंडे यांनी दिली.

सामाजिक उपक्रम राबवणार

रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, कोरोना चाचणी, सर्वरोग निदान शिबिर, गरजूंना अन्नधान्यवाटप, मास्क, औषध व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरोनाबाबत जनजागृती करून मंडळांतर्फे सामाजिक कार्याची माहिती रेकॉर्डिंग करून फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूबद्वारे पोचविणार असल्याचेही सांगण्यात आले. सचिन रत्ने, राजेंद्र खैरनार, हेमंत तेलंगी, महेश पगारे, गौरव बिरारी, सुशांत गालफाडे, कमलेश परदेशी, जय पाटील, प्रसाद शुक्ल, प्रसाद पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन : रमेश चौधरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com