खवय्यांची 'भरपेट' सोय! हॉटेल सुरू झाल्याने आनंदी आनंद; आवडीच्या पदार्थांसाठी लगबग

राजेंद्र अंकार
Saturday, 3 October 2020

ऑगस्टमध्ये शासनाने हळूहळू अनलॉक घोषित केल्याने हॉटेलचालकांना पार्सल सेवा सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने हॉटेलचालकांसह खवय्यानांही हायसं वाटलं. सिन्नर परिसरात दोन्ही बाजूंना औद्योगिक वसाहती आहेत. रोज असंख्य कामगार रोजगारासाठी कंपन्यांमध्ये जातात. 

नाशिक : (सिन्नर) लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता आल्याने हॉटेल सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने सिन्नरला खवय्यांची सोय झाल्याने आपल्या आवडीचे पदार्थ खाण्यासाठी शहरातील नामांकित हॉटेलवर खवय्ये जमू लागले आहेत. 

आवडीचे पदार्थ खाण्यासाठी लगबग 

सिन्नर शहरात सर्वत्र छोट्या-मोठ्या हॉटेलमुळे खवय्यांना मनपसंत खायला मिळत होते. मात्र मार्चपासून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या लॉकडाउनमुळे पाच ते सहा महिने ही छोटी-मोठी हॉटेल बंद असल्याने घरातच बनवलेले पदार्थ खाण्याशिवाय खवय्यांना पर्यायच नव्हता. हॉटेलचालकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. परंतु ऑॅगस्टमध्ये शासनाने हळूहळू अनलॉक घोषित केल्याने हॉटेलचालकांना पार्सल सेवा सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने हॉटेलचालकांसह खवय्यानांही हायसं वाटलं. सिन्नर परिसरात दोन्ही बाजूंना औद्योगिक वसाहती आहेत. रोज असंख्य कामगार रोजगारासाठी कंपन्यांमध्ये जातात. 

हेही वाचा >  लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

खवय्यांत आनंदी आनंद

बऱ्याचदा बाहेरून कंपनीच्या कामासाठी येणाऱ्यांचाही भरणा असतो. लॉकडाउनमुळे अनेक कामगारांची गैरसाय होत होती. आता मात्र शहरातील कानाकोपऱ्यातील हातगाडा, टपरी, छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये पार्सलच्या रूपात का होईना पण मनपसंतीचे पदार्थ मिळू लागल्याने खाणारे खवय्येही वाढले आहेत. शहराचा देवी रोड भाग, तर शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी ओळखला जाऊ लागला आहे. याच परिसरातील गार्डन मिसळ खाण्यासाठी, तर बाहेरगावचे खवय्येही आता हजेरी लावत आहेत. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि मास्कचे पालन करत हॉटेलचालक व्यवसाय करत आहे. 

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the opening of the hotel, Sinnar has access to food nashik marathi news