ऑप्‍थल्मिक, ऑप्‍टोमेट्री डिप्‍लोमाच्‍या अर्जांसाठी मुदतवाढ; विद्यापीठाचा निर्णय

अरुण मलाणी
Friday, 25 September 2020

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेल्‍या प्रवेश अर्जाची प्रत मुद्रित करून आवश्‍यक कागदपत्रांच्‍या स्‍वंस्‍वाक्षांकित छायाप्रतीसह समक्ष किंवा पोस्‍टाद्वारे विद्यापीठात सादर करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी अंतिम मुदत ८ ऑक्‍टोबरपर्यंत असेल, असेही विद्यापीठातर्फे कळविले आहे.  

नाशिक : डिप्‍लोमा इन ऑप्‍थल्‍मिक सायन्‍स व डिप्‍लोमा इन ऑप्‍टोमेट्री या पदविका अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे राबविल्‍या जाणाऱ्या या प्रक्रियेत अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार १ ऑक्‍टोबरपर्यंत इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येतील. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

डिप्‍लोमा इन ऑप्‍थल्‍मिक सायन्‍स व डिप्‍लोमा इन ऑप्‍टोमेट्री दोन्‍ही अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया विद्यापीठाच्‍या औरंगाबाद विभागीय केंद्रामार्फत राबविली जाते आहे. कोविड-१९ या संसर्गजन्‍य आजारामुळे प्रवेशासाठी आवश्‍यक विविध दाखले प्राप्त करण्यास विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्‍या विनंतीनुसार अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी १ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत वाढविलेली असल्‍याचे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेल्‍या प्रवेश अर्जाची प्रत मुद्रित करून आवश्‍यक कागदपत्रांच्‍या स्‍वंस्‍वाक्षांकित छायाप्रतीसह समक्ष किंवा पोस्‍टाद्वारे विद्यापीठात सादर करणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी अंतिम मुदत ८ ऑक्‍टोबरपर्यंत असेल, असेही विद्यापीठातर्फे कळविले आहे.  

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ophthalmic, optometry diploma Application extension till 1st October nashik marathi news