esakal | जगभरातील रुग्‍णांना नाशिकमध्ये उपचाराच्‍या संधी - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal 2.jpg

डॉ. नगरकर म्‍हणाले, की नाशिककरांना अत्‍याधुनिक सुविधा मिळाव्‍यात असा सदैव प्रयत्‍न असतो. शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे सुरू असताना, शहरात मेडिकल टूरिझमला चालना मिळण्यासाठी सीप्लेन आणि बोट क्लब उपक्रम उपयुक्‍त ठरतील.

जगभरातील रुग्‍णांना नाशिकमध्ये उपचाराच्‍या संधी - भुजबळ

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रात जलद गतीने बदल होत असून, शोध थक्‍क करणारे आहेत. नव्‍याने सुरू होत असलेल्‍या न्यूक्‍लिअर मेडिसीन विभागात रोगाच्‍या निदानासह प्रभावी उपचार करणेही शक्‍य होणार आहे. यातून वैद्यकीय क्षेत्रात ही नवीन क्रांती असून, नाशिकमध्ये जगभरातील रुग्‍णांना उपचाराची संधी मिळणार असल्‍याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्‍यक्‍त केले. 

कर्करोगग्रस्‍तांसाठी उपयुक्‍त ठरणार

एचसीजी मानवता कॅन्‍सर हॉस्‍पिटल येथे न्यूक्‍लिअर मेडिसीन विभागाचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २४) झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे प्रमुख व मुख्य सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर, न्यूक्लिअर मेडिसीन सीनिअर कन्सलटंट डॉ. चैतन्य बोरडे, न्यूक्लिअर मेडिसीन कन्सलटंट डॉ. प्रशांत पाटील, डॉ. स्‍नेहा रत्‍नपारखी, डॉ. विजय पालवे, ललित ससले आदी उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी अस्‍तित्‍वात आलेले हे तंत्रज्ञान नाशिकमध्ये उपलब्‍ध झाले असून, कर्करोगग्रस्‍तांसाठी उपयुक्‍त ठरणार आहे. कार्यक्रमापूर्वी दिवंगत विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आवश्‍यक

डॉ. नगरकर म्‍हणाले, की नाशिककरांना अत्‍याधुनिक सुविधा मिळाव्‍यात असा सदैव प्रयत्‍न असतो. शहराची वाटचाल स्मार्टसिटीकडे सुरू असताना, शहरात मेडिकल टूरिझमला चालना मिळण्यासाठी सीप्लेन आणि बोट क्लब उपक्रम उपयुक्‍त ठरतील. जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय होणे आवश्‍यक असून, त्‍यासाठी पालकमंत्र्यांनी नेतृत्‍व करण्याचे आवाहन आयएमए अध्यक्ष डॉ. चंद्रात्रे यांनी केले. न्यूक्लिअर मेडिसीन सीनिअर कन्सलटंट डॉ. चैतन्य बोर्डे यांनी नवीन उपकरणांबाबत माहिती देतानाच मानवता क्यूरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या विविध उपचारांची माहिती दिली.  

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;