नाशिकमध्ये घुबड, कोकिळेला आणखी एका संसर्गजन्य रोगाने ग्रासले! चिंता वाढली

sakal (89).jpg
sakal (89).jpg

नाशिक : या संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. हा आजार नाशिकमध्ये घुबड आणि कोकिळ या पक्ष्यांना झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिकमध्ये घुबड, कोकिळेला आणखी एका संसर्गजन्य रोगाने ग्रासले!

कोंबड्या अन्‌ कबुतरांना मोठ्या प्रमाणात मानमोडीने ग्रासले जाते. मानमोडी हा रोग जरी सर्व पक्ष्यांना होणारा असला, तरी मानमोडी आजार झालेल्या मृत कोंबड्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने आणि तशाच रस्त्यावर फेकून दिल्याने आजार इतर पक्ष्यांमध्ये पसरत असल्याचे आढळून आले आहे. मुळातच, पाळीव पक्ष्यांना लसीकरण करणे सक्तीचे असले तरी त्याचे पालन होत नसल्याने हा आजार वाढत असल्याची चिंता नेचर क्लब ऑफ नाशिकने व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये एका कावळ्याला हा आजार झाला; पण त्याची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्याच्यावर आजाराचे परिणाम जाणवला नाही. हा आजार पहिल्यांदा इंग्लंडमधील न्यू कॅसलमध्ये १९२७ मध्ये आणि १९२८ मध्ये भारतात रानीखेत (उत्तर प्रदेश) या भागात आढळल्याने या भागाच्या नावाने तो ओळखला जातो.पाळीव पक्षी आणि प्राण्यांना मानमोडीपासून बचावासाठी लसीकरण महत्त्वाचे असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. 

नाशिकमध्ये घुबड, कोकिळेला मानमोडी रोग 

मात्र, त्याच्या घरट्यातील कोकिळेच्या पिलाला हा आजार झाल्याचे संस्थेच्या निरीक्षणातून समोर आले. नाशिककरांमध्ये पाळीव पक्ष्यांचे आकर्षण दिवसेंदिवस वाढीस लागले आहे. पक्षीप्रेमींपैकी काही जण ‘लव बर्ड’सारखे पाळीव पक्षी निसर्गात राहू शकत नाहीत, तरीही पक्षी सोडून देतात. त्यांच्यापासून निसर्गातील पक्ष्यांना हा आजार पसरण्याचे प्रकार वाढला आहे. ही सुरवात असून, वेळेवर उपाययोजना न केल्यास आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

मानमोडी हा रोग निसर्गातील सर्व पक्ष्यांना होऊ शकतो. हा संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी जनजागृती करणे हाच उपाय आहे. तसेच हा आजार झालेल्या मृत पक्ष्यांची योग्य विल्हेवाट लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. 
-डॉ. संजय गायकवाड (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, औरंगाबाद) 


गेल्या महिनाभरात दोन पक्षी मानमोडी रोगाने ग्रासलेले दिसून आले. कोकिळ आणि घुबडला हा आजार झाल्याचे दिसून आले. हा आजार कायमस्वरूपी असल्याने असे पक्षी निसर्गात अधिक काळ जगत नाही. तसेच इतर पक्ष्यांच्या सानिध्यात हे पक्षी आल्यास त्यांना देखील हा आजार होत आहे. 
-मनोज वाघमारे (पक्षीमित्र)  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com