वेळ कधी सांगून येत नाही! इंटरनॅशनल स्कूलचे मालक आज घर चालविण्यासाठी काय करताएत?..एकदा वाचाच

international school owner.jpg
international school owner.jpg

नाशिक / सिडको : असं म्हणतात की " कोणतही काम छोट किंवा मोठं नसतं " त्याच मूर्तिमंत उदाहरण कोरोनाच्या या संकट काळात सिडको परिसरात बघायला मिळालं ! सध्या याबाबत सिडको परिसरात जोरदार चर्चा ऐकाला मिळत आहे 

सध्या तो चर्चेचा विषय

सिडको परिसरातील उत्तम नगर येथे असलेली नामांकित जीनियस इंटरनॅशनल स्कूल चे मालक ज्ञानेश्वर शेलार यांच्यावर एन कोरोनाच्या काळात घर चालवण्यासाठी अक्षरशः पालकांच्या दारोदारी भाजीपाला विक्री करण्याची वेळ आली. अशातही त्यांनी न डगमगता व कुठल्या प्रकारची लाज न बाळगता हे काम सुरू ठेवल्याने सध्या तो चर्चेचा विषय बनू पाहत आहे . सुरुवातीला गाड्यांवर भाजीपाला विक्री केल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारे काळजी घेऊन त्यांनी हे कार्य अजूनही सुरू ठेवले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला . त्यामुळे घर चालविणे सोपे गेले. मिनी फार्म असे नाव त्यांनी आपल्या ऑनलाइन भाजीपाला व्यवसायाला दिले आहे. यामध्ये शेतातून थेट आपल्या दारात भाजीपाला ते आणून देतात.

ऑनलाईन भाजीपाला विक्री

कमी हाताळलेल्या, शंभर टक्के स्वच्छता व निर्जंतुकीकरण, उत्कृष्ट दर्जाच्या ताज्या व गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळण्याचा उपाय म्हणून ते सध्या ऑनलाईन भाजीपाला विक्री करत आहेत. प्रत्येक भाजीसाठी सेपरेट पॅकिंग , ऑर्डर स्वीकारण्याचा वार सोमवार ते शुक्रवार व होम डिलिव्हरी शनिवार - रविवार तर ऑनलाइन पेमेंटचा स्विकार करतात. ग्राहक आवडीनुसार भाज्या निवडू शकतात

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची फी पालकांकडून मागणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर निर्भर राहण्यापेक्षा, आपणच आत्मनिर्भर झालेले बरे. या संकल्पनेतून नागरिकांना लागणारी गरजेची वस्तू म्हणून भाजीपाल्याची निवड केली व त्याला यशही मिळाले. या व्यवसायामुळे आज मी आर्थिक परिस्थितीने स्थिरस्थावर झालेलो आहे. भाजीपाल्याचा व्यवसायने मला जीवनात एक शिकायला मिळाली ती म्हणजे कोणतेही काम हलके किंवा भारी नसते . काम हे काम असते - ज्ञानेश्वर शेलार, जीनियस इंटरनॅशनल स्कूल, शाळा मालक , सिडको

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com