मालेगावला ओटू ड्युरा टँकसह 'इतके' ऑक्सिजन सिलेंडर झाले उपलब्ध

गोपाल भडंगे
Friday, 11 September 2020

जिल्ह्यात दोन दिवसांपासून ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत होता. येथील महापालिका प्रशासनाची यामुळे चांगलीच धावपळ उडाली होती.

नाशिक/मालेगाव : जिल्ह्यात दोन दिवसांपासून ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत होता. येथील महापालिका प्रशासनाची यामुळे चांगलीच धावपळ उडाली होती.

ऑक्सिजनच्या उपलब्धतेने दिलासा

बुधवारी (ता. ९) रात्रीतून व गुरुवारी (ता. १०) दिवसभरात येथील महापालिकेच्या दोन्ही कोविड केअर सेंटरसाठी २८० सिलिंडर उपलब्ध झाले. यापाठोपाठ जिल्हा रुग्णालयाकडून ५० सिलिंडरची क्षमता असलेले ओटू ड्युरा टँक उपलब्ध झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवली नाही. शुक्रवार (ता. ११) पर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल, असे महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

हेही वाचा > आश्चर्यंच! चोवीस तासांत एकाच लॅबमध्ये आला धक्कादायक रिपोर्ट; रुग्णाने सांगितली आपबिती

ओटू ड्युरा टँक

ओटू ड्युरा टँक सहारा रुग्णालयात बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात होते. या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन लाइन टाकण्यात आली आहे. त्याला टँकची जोडणी करण्यात येईल, असे आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीची निकड लक्षात घेऊन ड्युरा टँक उपलब्ध करून दिले. दरम्यान, गुरुवारी श्री. कासार यांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्यासह नव्याने ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यासाठी शहर व परिसरातील पाच जागांची पाहणी केली. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी (ता. ११) जळगाव, औरंगाबाद येथून सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा > नवनियुक्त आयुक्त दीपक पांडेंपुढे आव्हान! लाच स्वीकारताना पोलीस हवालदारावर एंटी करप्शनची कारवाई

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oxygen cylinder shortage in maalegaon nashik marathi news