परदेशातील नागरिकही चाखणार दिवाळी फराळाची चव; पार्सलने फराळ पाठविण्याचा मार्ग मोकळा

diwali faral.jpg
diwali faral.jpg

नाशिक : लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असताना परदेशातील नागरिकांना यंदा दिवाळी फराळाची चव चाखता येते की नाही, अशी परिस्थिती असताना विमानसेवा सुरू झाल्याने टपाल विभागाने त्यांची पार्सल सेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना विदेशातील आप्तस्वकीयांना पार्सलने फराळ पाठविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

परदेशात फराळ पाठविण्याचा मार्ग मोकळा 

शहरातील बहुतांश नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत. रक्षाबंधन आणि दिवाळीनिमित्त शहरातील कुटुंबीयांकडून राखी आणि दिवाळीचा फराळ पाठविला जातो. मार्च ते ऑगस्टदरम्यान जगात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने अनेक देशांकडून आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने टपाल विभागाची पार्सल सेवा बंद झाली होती. रक्षाबंधनला परदेशात राहणाऱ्या भावापर्यंत बहिणीची राखी पोचली नाही. पण सप्टेंबरपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, अनेक देशांची आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली. टपाल विभागाकडून पार्सल पाठविण्याची सुविधाही पूर्ववत करण्यात आली. परदेशात राहणाऱ्या शहरातील नागरिकांपर्यंत दिवाळी फराळ पाठविणे त्यामुळे शक्य झाले. गेल्या १० ते १२ दिवसांपासून शहरातील जीपीओ टपाल कार्यालयातून दिवाळी फराळचे पार्सल पाठविण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. या दिवसांत सुमारे शंभराहून आधिक पार्सल बुक झाले. अमेरिकेसाठी सर्वाधिक फराळाचे पार्सल बुकिंग झाले. नागरिकांचा पार्सल पाठविण्यात प्रतिसाद मिळत असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पार्सल पाठविण्याचे प्रमाण काहीअंशी कमी आहे. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

चीनवर बंदी कायम 
टपाल विभागाने पार्सल सेवा सुरू केलेल्या यादीत चीनचा समावेश आहे. प्रत्यक्षात सुरक्षेच्या हेतूने तेथील पार्सल सेवा बंदच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चीनचे पार्सल बुकिंगही केले जात नाही. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

द्रव पदार्थ, इलेक्ट्रिकल वस्‍तूंवर बंदी 
टपाल विभागाने पार्सल सेवा उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्येक पार्सलची तपासणी केली जात आहे. पार्सल पाठविणाऱ्या नागरिकांसमोर पार्सलची तपासणी करून पॅकिंग केले जात आहे. दिवाळी फराळ असेल तर त्यात द्रव पदार्थ आहे का? याची तपासणी टपाल कर्मचारी करत आहे. खात्री झाल्यावरच पार्सल पॅकिंग करून बुक केले जातेय. लोणचे, इलेक्ट्रिक वस्तू पाठविण्यावर पूर्णपणे बंदी आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com