धक्कादायक! "आसारामने लैंगिक अत्याचार केले नाहीत" शाळेत मुलांना हे काय सांगितलं जातयं?

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सातपूरच्या अशोकनगर येथील महापालिकेच्या बी. डी. भालेकर माध्यमिक विद्यालयात बुधवारी (ता. 12) सकाळी अकराला आसाराम भक्तांनी मातृ-पितृपूजनाचे व्याख्यान ठेवले होते. आसारामने लैंगिक अत्याचार केले नाहीत, तो निर्दोष असल्याची पत्रके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे तासभर थांबविले.

नाशिक : लैंगिक अत्याचारप्रकरणी तुरुंगात असलेला कथित आध्यात्मिक गुरू आसाराम याच्या उदात्तीकरणासाठी चक्क शाळांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशोकनगर येथील महापालिकेच्या शाळेत कार्यक्रम घेतल्याचा आरोप पालकांनी करत संताप व्यक्त केला. या प्रकरणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अशा कोणत्याच कार्यक्रमाला परवानगी दिली नसल्याचे सांगत हात झटकले आहेत. 

शाळेत शिकविण्याचे काम थांबवून घेतला कार्यक्रम 
सातपूरच्या अशोकनगर येथील महापालिकेच्या बी. डी. भालेकर माध्यमिक विद्यालयात बुधवारी (ता. 12) सकाळी अकराला आसाराम भक्तांनी मातृ-पितृपूजनाचे व्याख्यान ठेवले होते. आसारामने लैंगिक अत्याचार केले नाहीत, तो निर्दोष असल्याची पत्रके विद्यार्थ्यांना वाटण्यात आली. या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवणे तासभर थांबविले. कोणत्याही शाळेत असे कार्यक्रम घेण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्‍यक असते. मात्र शिक्षकांनी अशी परवानगीच घेतली नव्हती, असे महापालिका शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी सांगितले. कोणत्याही शाळेत बाबा-बुवांचे उदात्तीकरण करणारे कार्यक्रम शाळेचा अभ्यास बुडवून घेणे योग्य आहे काय, असा सवाल पालक उपस्थित करीत आहेत. अशा कार्यक्रमांच्या आडून आसारामच्या प्रतिमेचे डॅमेज कंट्रोल सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

 

No photo description available.

 हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

व्हॅलेंटाइन डेला मातृ-पितृपूजनाच्या निमित्त शाळेत आसारामचे उदात्तीकरण 
या घटनेबाबत संबंधिताची चौकशी सुरू केली असून, याबाबत अहवाल आल्यावर कारवाई करण्यात येईल. -देवीदास महाजन, शिक्षणाधिकारी  

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents Angry on Asaram bapu program in municipal school Nashik Marathi News