शिक्षणशास्त्र, एलएलबीच्या सीईटी अर्जाची शनिवारपर्यंत मुदतवाढ!

exam23.jpg
exam23.jpg

नाशिक : शिक्षणशास्त्र शाखेतील विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच विधी शाखेतील एलएलबीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना शनिवार (ता.30) पर्यंत अर्ज भरता येणार आहे. तर सीईटी सेलमार्फत या अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या संभाव्य तारखा जाहिर केल्या आहेत. जुलै अखेर, ऑगस्टमध्ये या परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. 

अर्जाची शनिवारपर्यंत मुदत 

विविध आठ अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेले अडथळे लक्षात घेता अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत उपलब्ध करून दिली होती. दुसऱ्यांना अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केलेली होती. त्यानुसार आता बी.एड. (जनरल व स्पेशल), एलएलबी (3 वर्षे), एम.एड., बीए-बी.एड./बी.एस्सी-बी.एड., बी.एड-एम.एड, एम.पीएड. बीपीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी शनिवार (ता.30) पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

सीईटी परीक्षेच्या संभाव्य तारखा 

बी.एड. (जनरल व स्पेशल)अभ्यासक्रमाची सीईटी 15 व 16 जुलैला घेण्याचे नियोजित आहे. तर एम.एड. आणि बीए-बी.एड./बी.एस्सी.बी.एड. या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा 24 जुलैला, बी.एड.-एम.एड. इंटीग्रेटेड कोर्सची सीईटी 19 जुलैला, एम.पीएड. आणि बी.पी.एड अभ्यासक्रमाची सीईटी 24 जुलैला घेण्याचे नियोजित आहे. विधी शाखेतील एलएलबी (5वर्षे कालावधी) अभ्यासक्रमाची सीईटी 24 तर एलएलबी (3 वर्षे) अभ्यासक्रमाची सीईटी 6 ऑगस्टला घेण्याचे सध्या नियोजित आहे. 

हॉटेल मॅनेजमेंटचया प्रवेशासाठी रविवारपर्यंत मुदत 

हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरींग टेक्‍नॉलॉजी शाखेतील पदवी अभ्यासक्रम बी.एचएमसीटी तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एम.एचएमसीटी अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्जाची रविवार (ता.31) पर्यंत मुदत आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांसह एमसीए, एम.आर्किटेक्‍चर या अभ्यासक्रमांच्या सीईटीची संभाव्य तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार 19 जुलैला ही परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com