धक्कादायक! पेस्ट कंट्रोल ठेका चौकशीची फाइल महापालिकेतून गायब; संशय बळावला

nashik mahapalika.jpg
nashik mahapalika.jpg

नाशिक : शहरात औषध फवारणी करण्यासाठी देण्यात आलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात अनियमितता आढळल्यानंतर तीन वर्षांपूर्वी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने चौकशी अहवाल सादर करूनही त्याची दखल आरोग्य विभागाने घेतली नाहीच. आता या चौकशीची फाइलही महापालिकेतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

तब्बल १९ कोटींचा ठेका ४६ कोटींवर पोचविल्याचा प्रकार समोर
वर्षभरापासून पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला सातत्याने मुदतवाढ दिल्यानंतर आता नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात दिग्विजय एंटरप्राइजेसला सोईस्कर होईल अशी भूमिका घेताना तब्बल १९ कोटींचा ठेका ४६ कोटींवर पोचविल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे ठेक्यासंदर्भात महापालिकेच्या निविदा समितीने नकारात्मक शेरा ओढला असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून ठेका देण्यासाठी वैद्यकीय विभागातील अधिकारी प्रयत्न करत आहेत. निविदाप्रक्रियेतील अन्य निविदाधारकांना अनामत रक्कम परत केली जात असल्याने संशय बळावला आहे.

प्रशासन काय भूमिका घेते,?

त्यात भर टाकणारा आणखी एक प्रकार समोर आला. २०१७ मध्ये स्थायी समितीने पेस्ट कंट्रोल ठेक्याची चौकशी लावण्याचा ठराव पारित केला. तत्कालीन स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी महासभेत ठेका रद्द करण्याची मागणी केल्यानंतर तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन ठेका रद्द करण्याची मागणी मान्य केली. या संदर्भात चौकशी समितीदेखील नियुक्त करण्यात आली. समितीने अहवाल सादर केला, परंतु ती फाइल गायब झाल्याने आता प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

पेस्ट कंट्रोल ठेक्यातील अनियमिततेचे मुद्दे 
नवीन निविदाप्रक्रिया राबविताना अनुभवाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष 
पूर्वीचा ठेका कर्मचारी पुरविण्याचा होता, त्यात पेस्ट कंट्रोल अनुभवाची अट नव्हती 

आयुक्तांच्या मान्यतेशिवाय मूळ प्राकलनात बदल 
तांत्रिक व जीवशास्त्राशी संबंधित काम असताना अतांत्रिक कंपनीला ठेका 
प्राकलन तपासण्यासाठी व्यवस्था नसताना त्रयस्थ संस्थेकडूनही तपासणी नाही. दिग्विजय एंटरप्राइजेसची नोंदणी इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनकडे नाही .

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com