PHOTO : धक्कादायक! यात्रेत चिमुरडी अचानक गायब...शोध घेतल्यावर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

येवला तालुक्‍यातील इलेक्‍ट्रिकल्स काम करणारी व्यक्ती पत्नी व दोन लहान मुलींसह नैताळे येथील मतोबा महाराज यात्रेनिमित्त पंधरा दिवसांचा कामाचा ठेका घेऊन नैताळे येथे राहुटी करून राहत होते. मंगळवारी रात्री नऊला पीडितेचे वडील जेवणाला राहुटीत आले असता अनोळखी व्यक्तीने चारवर्षीय बालिकेला नेल्याचा निरोप त्यांच्याच मुलीने धावत येत दिला.

नाशिक : नैताळे येथील मतोबा महाराज यात्रोत्सवात पाळणे खेळण्याचा आनंद घेत असलेल्या चारवर्षीय बालिकेला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता.14) रात्री साडेनऊला घडली. पीडित मुलीच्या वडिलांनी निफाड पोलिसांत तक्रार दिली. संशयितास त्वरित अटक करण्यात आली. बुधवारी (ता. 15) संशयितास निफाड न्यायालयात हजर केले असता त्याला 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

पोलिसांच्या माहितीनुसार....असा घडला प्रकार

निफाड पोलिसांनी सांगितले, की येवला तालुक्‍यातील इलेक्‍ट्रिकल्स काम करणारी व्यक्ती पत्नी व दोन लहान मुलींसह नैताळे येथील मतोबा महाराज यात्रेनिमित्त पंधरा दिवसांचा कामाचा ठेका घेऊन नैताळे येथे राहुटी करून राहत होते. मंगळवारी रात्री नऊला पीडितेचे वडील जेवणाला राहुटीत आले असता अनोळखी व्यक्तीने चारवर्षीय बालिकेला नेल्याचा निरोप त्यांच्याच मुलीने धावत येत दिला. पीडित मुलीचे वडील व पाळणेवाले मालक दादा मोरे (श्रीरामपूर, जि. नगर) यांनी बालिकेचा शोध घेण्यास सुरवात केली.

Image may contain: one or more people, people standing and outdoor

नैताळे-विंचूर रस्त्यावर बांबू विक्रेत्यांनजीक फिकट गुलाबी शर्ट आणि पॅट घातलेल्या तरुणाकडे ही बालिका दिसली. संशयिताने बालिकेवर अत्याचार केल्याचे दिसून आले. पीडिताच्या वडिलांनी संशयितास त्वरित पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित सुदाम भिका सोनवणे (वय 28, कोळवाडी, ता. निफाड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनवण्यात आली. पोलिस निरीक्षक रंगराव सानप तपास करीत आहेत. 

ह्रदयद्रावक -  VIDEO : ह्रदयद्रावक! पतंगामागे धावत होता चिमुकला...ऐन मकरसंक्रांतीलाच आक्रोश..

हेही वाचा > लॉटरी लागल्याचा आनंदच आनंद...अन् क्षणात दु:खाचा डोंगर...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Physical abuse on girl Child in Natale Nashik Crime Marathi News