विवाहाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार; एकास दहा वर्षांची सक्तमजुरी 

विनोद बेदरकर
Thursday, 14 January 2021

महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत विवाहाचे आमिष दाखवून निलकंठ दर्शन अर्पाटमेंट परिसरातील सदनिकेत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

नाशिक : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी रोडवरील शैलेंद्र अरुण कुलकर्णी याला विवाहाचे आमिष दाखवून महिलेशी संबंध ठेवून नंतर विवाहाला नकार दिल्यावरून दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. नेमका प्रकार काय?

शारीरिक संबंध ठेवून विवाहास नकार
स्नेहनगर परिसरातील शैलेश कुलकर्णी (३९, गुरुजन अपार्टमेंट, दिंडोरी रोड) यांनी जानेवारी २०१३ ते २४ ऑगस्ट २०१५ यादरम्यान तक्रारदार महिलेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत विवाहाचे आमिष दाखवून निलकंठ दर्शन अर्पाटमेंट परिसरातील सदनिकेत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून विवाहास नकार देऊन शिवीगाळ व दमदाटी केली. महिलेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. महिला पोलिस उपनिरीक्षक व्ही. डी. पुंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास होऊन संशयिताविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एस. एस. नायर यांच्या न्यायालयापुढे सुनावणी होऊन संशयिताविरोधात गुन्हा सिद्ध झाला.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

दहा वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांची दंडाची शिक्षा

न्यायालयाने आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात दहा वर्षांची सक्तमजुरी, दहा हजारांची दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास सहा महिने साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. आर. एम. कोतवाल यांनी कामकाज पाहिले. हवालदार एम. एम. पिंगळे, पोलिस नाईक एस. एल. जगताप यांनी पाठपुरावा केला.  

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: physical harassment with woman crime marathi news