#COVID19 : सोशल मिडियावरून कोरोना रुग्ण संबंधित संदेश व्हायरल करणे पडले महागात!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका वकिलाचाही समावेश आहे. इंदिरानगर पोलिसांत शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिपाई अमीर आयूब शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. ऍड. अजिंक्‍य गिते यांच्या फेसबुक पेजवरून पाथर्डी फाटा भागातील हरिविश्‍वमध्ये संशयित कोरोना रुग्ण सापडले, असा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिक : जगभर सगळीकडे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने व्यवस्था ओस पडल्या असून, उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. अशाही स्थितीत प्रशासकीय यंत्रणेच्या नावाने परस्पर सोशल मीडियावर संदेश व्हायरल करून नागरिकांमध्ये संभ्रम वाढविणाऱ्या संदेशावर पोलिसांची करडी नजर असून, अफवा पसरविल्यावरून चौघांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. 

दोन दिवसांत चौघांविरोधात गुन्हे दाखल 
विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका वकिलाचाही समावेश आहे. इंदिरानगर पोलिसांत शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास शिपाई अमीर आयूब शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. ऍड. अजिंक्‍य गिते यांच्या फेसबुक पेजवरून पाथर्डी फाटा भागातील हरिविश्‍वमध्ये संशयित कोरोना रुग्ण सापडले, असा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी (ता.20) महापालिका आयुक्तांच्या नावाने परस्पर संदेश व्हायरल केल्यावरून सायबर पोलिसांत तुषार जगताप, निखिल पवार आणि सुभाष पाटील अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

वडाळ्यात सराईत हद्दपार 
वडाळा शिवारातील मेहबूबनगर भागातील सराईत सागर शिंदे (वय 26) याच्याविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्याने हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला सहाय्यक पोलिस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांनी एक वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हेशोध पथकाने ही कारवाई केली.  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police charged filed on four spreaders who Rumors on social media Nashik Marathi Crime News