पोलिस ठाण्यातील डिटेक्शन ब्रॅंच खांदेपालट; पोलिस आयुक्त पांडेंचा प्रस्थापितांना दणका 

विनोद बेदरकर
Thursday, 1 October 2020

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात १३ पोलिस ठाणी येत असून, त्यातील महत्त्वाच्या डिटेक्शन ब्रॅचमधील ड्यूटीसाठी कायम स्पर्धा असते. पोलिसांचा ड्रेस घालावा लागत नाही. तपासाच्या नावाने कायम फिरताना अवैध धंद्याशी संबध ठेवून गुन्हेगारीच्या तपासासोबत इतर कामातच सक्रिय असल्याचे काही प्रकार उजेडात आले.

नाशिक : वर्षानुवर्षे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत ठाण मांडून बसलेल्या आणि शहरात सोनसाखळ्या चोरीसह विविध गुन्हेगारी वाढत असताना निष्क्रिय बनलेल्या डिटेक्शन ब्रॅचमधील भाऊसाहेबांना नवीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सगळ्याच पोलिस ठाण्यातील डिटेक्शन ब्रॅच (डीबी) मधील खांदेपालट प्रस्थापितांना दणका दिला आहे. 

पोलिस ठाण्यातील डीबी खांदेपालट 
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात १३ पोलिस ठाणी येत असून, त्यातील महत्त्वाच्या डिटेक्शन ब्रॅचमधील ड्यूटीसाठी कायम स्पर्धा असते. पोलिसांचा ड्रेस घालावा लागत नाही. तपासाच्या नावाने कायम फिरताना अवैध धंद्याशी संबध ठेवून गुन्हेगारीच्या तपासासोबत इतर कामातच सक्रिय असल्याचे काही प्रकार उजेडात आले. सिडकोत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात एकजण सापडला. डिटेक्शन ब्रॅचमध्ये काम करण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेचा विचार करीत आणि त्यातील कामांचे मूल्यमापन पाहून पोलिस आयुक्तालयात खांदेपालट झाली आहे. सगळ्या पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध (डिटेक्शन ब्रॅच) मधील प्रस्थापितांना आयुक्तांनी हलविण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

२३ सोनसाखळ्या ओरबडल्या 
शहरात काही दिवसांपासून गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. या महिन्यात ४ तारखेपासून सोनसाखळ्या चोरणारे सक्रिय झाले आहेत. दुचाकीवरून येत महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या लंपास करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. ४ सप्टेंबरपासून आजपर्यंत २३ हून आधिक प्रकार उजेडात आले आहेत. इतर चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. शहरातील गुन्हेगारी वाढत असून, गुन्ह्याच्या तपासात मात्र आजिबात प्रगती दिसत नसल्याने पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेत आज विविध पोलिस ठाण्यांतील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांची खांदेपालट केली.  

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Commissioner's New Action Plan nashik marathi news