'माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर!'...म्हणत त्यांनी तिला...

Police file crime case against the police for harassing the bride.jpg
Police file crime case against the police for harassing the bride.jpg

नाशिक : पतीला कंपनी टाकण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाहीत. तुझ्या पायाला कोड आहेत. तुम्ही फसविले. लग्नात मानपान झाला नाही, अशी कुरापत काढून येथील कलेक्‍टरपट्टा भागातील माहेरवाशीन काजल महेश निकम (वय 23) हिचा छळ करणाऱ्या पती महेश याच्यासह सात जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

असा आहे प्रकार

विवाहानंतर एक महिने चांगले वागविल्यानंतर पती महेश निकम (रा. नाशिक) , सासरे प्रभाकर निकम, जेठ, जेठाणी, नणंद, नंदाई, मामासासरे यांनी आमच्या प्रतिष्ठेप्रमाणे लग्न लावून दिले नाही. माहेरून कंपनी टाकण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये. तुला नांदविणार नाही. तुझ्या पायाला कोड आहे. आम्हाला फसविले, अशी कुरापत काढत शारीरिक व मानसिक छळ करीत विवाहितेला मारहाण केली. अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून माहेरी हाकलून दिल्याचे काजलने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

माहेरवाशीन काजल महेश निकम (वय 23) हिचा छळ करणाऱ्या पती महेश याच्यासह सात जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com