शरद पवारांच्या दौऱ्याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना पोलिसांच्या नोटीसा; घरातच केलं स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज नाशिक दौरा आहे. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यात घोषणाबाजी आणि विरोध करण्यास प्रतिबंध केला आहे 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज नाशिक दौरा आहे. या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यात घोषणाबाजी आणि विरोध करण्यास प्रतिबंध केला आहे 

मराठा समाजाच्या समन्वयकांच्या घरी पोलीस बंदोबस्त

माजी वनमंत्री विनायक दादा पाटील यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार नाशिकला आले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे करत समन्वयकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांच्या घरी पोलीस बंदोबस्त ठेवला असून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्यात गोंधळ घातला जाऊ शकतो, या भीतीने पोलिसांनी आधीच खबरदारी घेतली आहे.

कांदाप्रश्नी शरद पवार करणार मध्यस्थी

पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना कलम 149 ची नोटीसा बजावल्या असून घरातच केलं स्थानबद्ध करण्यात आलं आहे. कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार हा दौरा करत आहे. शरद पवार त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police notice to Maratha Kranti Morcha coordinators on Sharad Pawar visit nashik marathi news