खाकीवर कोरोनाचे सावट कायम! सरासरी दहामागे एका पोलिसाला कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

मार्च महिन्यापासून आतापर्यंत ३४२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण मनुष्यबळाचा विचार करता दहामागे एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येतंय. याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पुढाकार घेऊन पहिल्या कोविड केअर सेंटरची सुरुवात केली.

नाशिक : मार्च महिन्यापासून आतापर्यंत ३४२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण मनुष्यबळाचा विचार करता दहामागे एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येतंय. याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पुढाकार घेऊन पहिल्या कोविड केअर सेंटरची सुरुवात केली.

दहापैकी एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण

शहर पोलिस दलात तीन हजारांच्या घरात पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, त्यातील ३४२ व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे.  त्यातील २६० पोलिस बरे होऊन आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. सुरुवातीस पोलिसांपासून दूर असलेला कोरोना हायपाय पसरवित आहे. शहर पोलिस दलात सरासरी दहापैकी एका कर्मचाऱ्यास करोनाची लागण झाली आहे. दुर्दैवाने हे प्रमाण वाढत आहे. शहर पोलिस दलात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा झाली असून, सध्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये २८ जणांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

होम क्वारंटाइन कर्मचाऱ्यांची संख्या ६७

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तेथे २५ पोलिस कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक उपचारांसाठी दाखल आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये २८ जणांवर उपचार सुरू आहेत. कमी लक्षणे असणे किंवा बरे झाल्यानंतर सुरक्षिततेसाठी होम क्वारंटाइन असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ६७ आहे.

हेही वाचा > एक वाईनची बाटली पडली तब्बल सव्वा लाखाला; भामट्याने केले बॅँक खाते साफ

शहर पोलिस दलातील सहावा मृत्यू; पोलिस दलात हळहळ​

शहर वाहतूक शाखा युनिट दोनमधील पोलिस हवालदार निवृत्ती निंबा जाधव (वय ५२) यांचा रविवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शहर पोलिस दलातील हा सहावा मृत्यू असून, पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. हवालदार जाधव यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे जाधव रजेवर गेले. मात्र, त्यांनाही कोरोनाची लागण झाली. २६ सप्टेंबर रोजी त्यांना पंचवटीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police officers suffer from corona virus nashik marathi news