देव धावून येतो तो असा! धावत्या रेल्वेत प्रसुतींच्या असह्य कळा अन् मग....

delivery in railway.png
delivery in railway.png

नाशिक / नांदगाव : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून उत्तरप्रदेशात जाणार्‍या महिलेला नांदगाव रेल्वेस्थानकावर प्रसूती वेदना होत असतांना रेल्वे व शहर पोलीस देवदूतासारखे धावून गेले. या महिलेस तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे दोन जीव वाचल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

असे आले देवदूत...!

शनिवारी पहाटे 3.30 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकावर आलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसने उत्तरप्रदेश (गोंडा) येथील आदित्यप्रसाद जैस्वाल हे पत्नी सुमितादेवीसोबत प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान जैस्वाल यांच्या पत्नीस प्रसुती वेदना असह्य होत असल्याने त्यांनी तिकीट तपासणी अधिकार्‍याला सांगितल्याने नांदगाव रेल्वेस्थानकावर गाडी थांबविण्यात आली. याचवेळी रेल्वेचे एएसआय शिवाजी इघे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मुलगा चेतन यास बोलवून घेतले.

मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही...

त्यांनी 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. मनमाड येथे रुग्णवाहिकेसाठी फोन केल्यास कालापव्यय होणार होता. त्यामुळे इघे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शहर पोलिसाशी संपर्क साधून गस्तीवरील पोलीस सेवक दिनेश सुळ व वाघ यांना परिस्थितीची माहिती दिल्याने ते वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. त्याच वाहनांतून महिलेस नांदगाव ग्रामीण रुग्णालयात नेवून दाखल करण्यात आले.

महिला व कन्या सुखरूप

महिलेची सुखरूप प्रसुती होऊन तिने कन्यारत्नास जन्म दिला. बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी सांगितले. या सहकार्याने भारावलेल्या माता-पित्याने पोलिसांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com