vishwas-nangre-patil-nashik 123.jpg
vishwas-nangre-patil-nashik 123.jpg

पोलीस दलात खळबळ : विश्वास नांगरेंची जबरदस्त एक्शन.. पोलीसाला आर्थिक मध्यस्थी पडली महागात

नाशिक : गेल्या महिन्यात नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील गोरख खर्जुल प्रकरणात एक अधिकारी व पाच कर्मचा-यांचे निलंबन झाले होते. त्यापूर्वी देवळाली कॅम्प येथील पाच कर्मचारीही कामात कसूर केल्याच्या कारणावरुन निलंबित झाले होते. त्यानंतर पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर येताच विश्वास नांगरे पाटलांनी जबरदस्त कारवाई केल्याचे समजते.

तक्रारी पोलीस आयुक्त यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या

नाशिकरोडच्या एका पोलीस अधिका-याची खातेअंतर्गत चौकशी सुरु आहे. आयुक्तालयातील चौकशी अधिकारी (डी.ई.) व नाशिकरोड पोलीस ठाण्यात कार्यरत एक पोलीस कर्मचारी यांनी या प्रकरणात आर्थिक देवाण-घेवाण केल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या प्रकरणात संबंधित कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी आढळून आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्याला निलंबित केल्याचे समजते. आयुक्तालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांचीही चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे समजते.

पोलीस दलात खळबळ

नाशिकरोड पोलीस ठाण्यातील कर्मचा-याला एका चौकशी प्रकरणात आर्थिक मध्यस्थी केल्याच्या कारणावरुन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केल्याचे समजते. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील गोरख खर्जुल प्रकरणात एक अधिकारी व पाच कर्मचा-यांचे निलंबन झाले होते. त्यापूर्वी देवळाली कॅम्प येथील पाच कर्मचारीही कामात कसूर केल्याच्या कारणावरुन निलंबित झाले होते. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळाली गाव चौकीतील एक अधिकारी व कर्मचा-यांची बदली करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आर्थिक देवाण-घेवाणीवरुन झालेल्या निलंबनावरुन पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com