बाईकवर डबलसीट फिरताय..? सावधान...जराही उल्लंघन केले तर पडेल महागात

police at night 1.jpg
police at night 1.jpg

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउनसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शहरात पुन्हा एकदा पोलिस विभागाने कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे यापुढे दुचाकीवरून डबलसीट प्रवास, मास्क न लावणे आदींसह कोरोनाबाबतीत शासनाने घालून दिलेले नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यात खासकरून दुचाकीवरून डबलसीट फिरणारे दुचाकीचालक पोलिसांच्या रडारवर आहेत. आज कारवाईच्या पहिल्याच दिवशी 100 डबलसीट दुचाकीस्वार आणि नियम न पाळणाऱ्या 909 बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली.

डबलसीट फिरताय सावधान.... पोलिस कारवाईला पुन्हा सुरवात
 शहरात काही आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जून महिन्यात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळताच नागरिकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यास सुरूवात झाली. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार मंगळवार (ता. 30) पासून जिल्ह्यात सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी लागू आहे. दिवसाही नागरिकांनी कामानिमित्त घराबाहेर पडतांना वावरतांना मास्कचा वापर करणे, गर्दी टाळणे, दुचाकीवर डबलसीट प्रवास न करणे यांसारख्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तरीही नागरिकांकडून होत असलेल्या उल्लंघनामुळे पोलिसांकडून कारवाई सुरू झाली आहे. त्यानुसार नागरिकांना विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मंगळवारी रात्रीनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी करीत कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा > "बा विठुराया..! चक्क निवृत्तीनाथ महाराजांनाही नाही सोडले.." एसटी महामंडळाचा चिंधीचोरपणा चव्हाट्यावर
आतापर्यंतची कारवाई
परिमंडळ एक
नियमांचे उल्लंघन करणारे 606 नागरिक
दुचाकी 25 जप्त
चारचाकी 17 जप्त

परिमंडळ दोन
नियमांचे उल्लंघन करणारे 303 नागरिक
डबलसीट दुचाकीवरून प्रवास 100

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com