गावगाड्याच्या राजकारणाची तालुक्यात रंगत; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

प्रशांत बैरागी
Thursday, 14 January 2021

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बागलाण तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, त्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. नामपूरला वडील आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

नामपूर (नाशिक) : बागलाण तालुक्यात १५ जानेवारीला होणाऱ्या ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे गावगाड्याचे राजकारण रंगतदार बनले आहे. भव्य रॅलीच्या शक्तिप्रदर्शनातून ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. गावातील मातब्बर राजकीय नेतेही प्रचारात उतरल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तालुक्यात पक्षविरहीत निवडणुका होत असल्याने तरुणाईचा दांडगा उत्साह दिसत आहे. 

महसूल विभागाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बागलाण तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, त्यातील नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. नामपूरला वडील आणि मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असल्याने चर्चेचा विषय बनला आहे. आमदार दिलीप बोरसे यांच्या लाडूद गावात उच्चविद्याविभूषित तरुणी व तिचा अभियंता असलेला भाऊ रिंगणात आहेत. मोसम खोऱ्यातील बहुतेक ग्रामपंचातींसाठी दुरंगी, तिरंगी लढती रंगल्या आहेत. प्रस्थापितांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत तरुण-सुशिक्षित उमेदवारांना रिंगणात उतरविले असून, या उमेदवारांनी मतदारांच्या गाठी-भेटी घेण्यावर भर दिला. निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, महसूल विभागाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. 

बिनविरोध ग्रामपंचायती : 

अंबासन, रातीर, रामतीर, जुनी शेमळी, नवी शेमळी, मोराणे, सांडस, कुपखेडा, दरेगाव, नळकस 

आकडे बोलतात 

- मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : ३१ 
- वैध नामांकनपत्र दाखल : एक हजार १०४ 
- माघार घेतलेल्या सदस्यसंख्या : ४१३ 
- रिक्त पदे : सहा 
- बिनविरोध सदस्य : १६३ 
- रिंगणातील एकूण उमेदवार : ६८४ 

हेही वाचा > एकच व्यवहार आणि जर्मनीला उच्च शिक्षण घेण्याचे तरुणाचे स्वप्न क्षणार्धात भंगले! 

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती

नामपूर, लाडुद, निताणे, दऱ्हाणे, इंदिरानगर, खमताणे, कंधाणे, कोळीपाडा, दोधेश्वर, तरसाळी, ताहाराबाद, रावेर, कठगड, सारदे, उत्राणे, राजपूर पांडे, बिजोटे, औंदाणेपाडा, कौतिकपाडा, ब्राह्मणगाव, बोढरी, बिलपुरी, श्रीपूरवडे, वडे खुर्द, टिंगरी, ठेंगोडा, कोटबेल, मळगाव भामेर, लखमापूर, देवळाणे, वाडीपिसोळ, जयपूर, एकलहरे, सोमपूर, इजमाणे, धांद्री, विंचुरे, पिंपळदर, यशवंतनगर, शेवरे, करंजाड, भुयाणे.  

हेही वाचा > तरुणाकडून धक्कादायक वस्तू सापडताच पोलीसही हैराण! युवावर्गाला सहज मिळणाऱ्या गोष्टीचा लावणार शोध?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politicians ready for Gram Panchayat elections in Baglan taluka nashik political news