अभूतपूर्व! कत्तल होऊनही 'त्याने' जगायचे सोडले नाही...नाशिकमधील आश्चर्यकारक घटना..

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

 शासनाने संबंधीत बाबीचा प्रकल्प निविदेत सहभाग करून अटी व शर्ती निर्धारित केल्या तरी त्यावर गांभीर्याने उपयोजना होत नाहीत. अथवा त्या निर्धारित नियमानुसार व्हाव्यात यासाठी शक्यतो कुणीही पुढे येत नाही अथवा आले तरी त्यास अपेक्षित असे यश शासकीय यंत्रणेच्या उदासीन वृत्तीमुळे मिळत नाही. अशी एकीकडे वस्तूस्थिती असतांना काही घटना याला या परिस्थितीत नवी उमेद व प्रेरणा देवून जातात.

नाशिक / वणी : शासनाने संबंधीत बाबीचा प्रकल्प निविदेत सहभाग करून अटी व शर्ती निर्धारित केल्या तरी त्यावर गांभीर्याने उपयोजना होत नाहीत. अथवा त्या निर्धारित नियमानुसार व्हाव्यात यासाठी शक्यतो कुणीही पुढे येत नाही अथवा आले तरी त्यास अपेक्षित असे यश शासकीय यंत्रणेच्या उदानसीन वृत्तीमुळे मिळत नाही. अशी एकीकडे  वस्तूस्थिती असतांना काही घटना याला या परिस्थितीत नवी उमेद व प्रेरणा देवून जातात. अशीच एक अभूतपूर्व घटना नुकतीच नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागात घडली.

अशी राबविली मोहिम

नाशिक - नामपूर या राज्य मार्गाचे रुंदीकरण प्रक्रियेत तोडून रस्त्याच्या कडेला पडलेला महाकाय वटवृक्ष अगदी अवघड घाट रस्त्याने समुद्रसपाटी पासून तब्बल ४५०० फूट उंचावर.. प्रयत्नांना तंत्रज्ञानाची जोड देत.. अवजड वाहनांवर वाहून नेण्यात आला आणि यशस्वीरीत्या तो जमिनीत लावून तो अल्प कालावधीत पल्लवित देखील झाला. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दि. ०२ मे, २०२० रोजी प्रवासा दरम्यान रस्त्याच्या कडेला पडलेला वटवृक्ष (खोड) पाहिले. वनस्पतीशास्त्र हा त्यांचा अभ्यास, संशोधन व आवडीचा विषय असल्याकारणाने त्यांनी त्या वटवृक्षाच्या खोडाचे परीक्षण केले आणि त्या बाबत सकारात्मक उद्देश मनात ठेवून ते योग्य ठिकाणी रोपण करण्याचा निर्धार केला. नाशिक- दिंडोरी- नामपूर या राज्यमार्गच्या रुंदीकरणाच्या कामात तोडण्यात आलेल्या शेकडो वर्षाच्या वट वृक्षाच्या खोडाचे घाट रस्त्यादरम्यान वृक्षप्रेमी व प्रशासनाच्या मदतीने यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. आणि त्यात खोडास वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येस पालवी फुटु लागल्याने वृक्षप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

गांभीर्याने उपयोजना नाही

देशांतर्गत विविध ठिकाणी दळण - वळण उद्देशाने रस्ते व महामार्ग विकास कामे सातत्यपूर्वक सुरू असून यात रस्ते उभारणी, रस्ते रुंदीकरण, घाटरस्ते व उड्डाणपूल उभारणी आदीसह विविध उपक्रम राबविले जातात. यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग व आरे कारशेड हे विषय नव्याने सांगण्याची येथे नक्कीच आवश्यकता नाही. मात्र विकास कामे सुरू असतांना तोडलेल्या झाडांवर योग्य उपयोजना अथवा त्यांचे तांत्रिक साहित्याच्या वापरासह पुनर्वसन होणे तितकेच आवश्यक आहे. शासनाने संबंधीत बाबीचा प्रकल्प निविदेत सहभाग करून अटी व शर्ती निर्धारित केल्या तरी त्यावर गांभीर्याने उपयोजना होत नाहीत. अथवा त्या निर्धारित नियमानुसार व्हाव्यात यासाठी शक्यतो कुणीही पुढे येत नाही अथवा आले तरी त्यास अपेक्षित असे यश शासकीय यंत्रणेच्या उदानसीन वृत्तीमुळे मिळत नाही. अशी एकीकडे  वस्तूस्थिती असतांना काही घटना याला या परिस्थितीत नवी उमेद व प्रेरणा देवून जातात..

अतिशय बिकट परिस्थिती आणि भौगोलिक आव्हाने

मागील २ वर्षांपासून घाट रस्त्यावर विविध ठिकाणी वृक्षलागवड व वन्यपक्षी संगोपनासाठी कळवण पोलीस ठाणे येथील पोलीस कॉन्स्टेबल योगश गवळी व त्यांचे सहकारी हे कार्यरत आहेत. वृक्ष पुनर्वसन संदर्भीय उद्देश आणि ईच्छा अतिशय सुंदर असली तरी परिस्थिती आणि भौगोलिक आव्हाने हे अतिशय बिकट आहेत. याची दोघांना देखील जाणीव असतांना त्यांनी या उद्देशाला पूर्ण करण्या बाबत विडा उचलला आणि अद्भुतपूर्व  प्रयत्न सुरू झाले. आता आव्हान होते ते सदरचे महाकाय वटवृक्षाचे खोड हे नांदुरी - श्री क्षेत्र सप्तशृंगगड या घाट रस्त्याच्या मध्यावर असलेल्या रतनगड (माकड पॉईंट) या ठिकाणी नेवून त्याचे यशस्वीपणे रोपण करायचे. कारण या परिसरात कुठे ही वटवृक्ष नाही अथवा वटवृक्ष गडावर येतंच नाही अश्या ऐकलेल्या तक्रारी. त्यातुन तेथे या प्रकारातील झाड लावायचे असे ठरले.

निसर्गप्रेमींचे नियोजन व प्रयत्नांची गोळा बेरीज

मौजे सप्तशृंगगड हे ठिकाण अद्यास्वयंभू शक्तीपीठ अर्थात आई सप्तशृंगी मातेच्या चरणस्पर्शाने व्याप्त व पवित्र असे तीर्थक्षेत्र असून वर्षभरात येणारी भाविकांची संख्या ही किमान ४० ते ४५ लक्ष इतकी असते. अध्यात्मिक पर्यटन प्रकारात गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या आणि निसर्ग पर्यटन म्हणून येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करता या तिर्थक्षेत्रावर विविध पर्यटन केंद्र विकसित करण्याची संधी आहे. यातील एक ठिकाण म्हणजे रतनगड (माकडं पॉईंट) जेथे वर्षभर मोठ्या संख्येने मर्कट अर्थात माकडं व वानर प्रकारातील वन्यप्राण्यांचा वावर असतो. तेथे सुशोभिकरण, सावली व प्राणांना आश्रय तयार करण्यासाठी सदर झाडाच्या खोडाचा वापर करण्याचा उद्देश तसेच वटपौर्णिमेला गडावर भगवतीच्या दर्शनार्थी महिला भाविकांची तसेच स्थानिक महिला वर्गाला पूजेची संभाव्य सुविधा विचारात घेता. दोघां निसर्गप्रेमींनी त्यांच्या नियोजन व प्रयत्नांची गोळा बेरीज सुरू केली.

पुढील ४८ तासात त्यास पालवी देखील फुटली.

१ जुन रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता अभियान सुरू झाले... दरेंगाव - नांदुरी या सीमेवर मागील ५ महिन्यापासून कापून पडलेले किमान ८० - ९० वर्ष जुने महाकाय वृक्षाचे खोड हे २ पोकलँड, १ क्रेन, २ जे सी बी, १ कंटेनर, १ पाणी टँकर, १ पिकअप आदी वाहन, यंत्र आणि सामग्रीच्या माध्यमातून रतनगड (माकड पॉईंट) येथे प्रयत्नानाची पराकाष्टा करतं आणण्यात आले. निर्धारित प्रक्रिया व नियोजनानुसार तेथे यंत्राच्या साहाय्याने एक मोठा खड्डा (अंदाजे आकार २४x१०x६) करून ठेवण्यात आले आणि पुढील ४८ तासात त्यास पालवी देखील फुटली.

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

मोहिमेचे यश

अशी अभूतपूर्व प्रक्रिया राबवितांना दोन्ही निसर्गप्रेमींनी केलेले इतरांचे प्रबोधन, यंत्र आणि तंत्रज्ञान आदींसाठी साधलेला समन्वय आणि उद्देशानुरूप केलेला सकारात्मक प्रयत्न त्यांना या मोहिमेत यश देवून गेला. सर्वसाधारण या प्रक्रियेसाठी अपेक्षित खर्च हा किमान १ ते १.२५ लक्ष असू शकला असता मात्र या प्रक्रियेत समविचारी माणसं जोडून अत्यंत अल्प खर्चात  योग्य व सर्वोत्तपरी सुरक्षित अश्या उपयोजना राबवून हा उपक्रम पूर्ण झाला.

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

जुना संदर्भ
१९५५ साली संत गाडगेबाबा यांचे चैत्र यात्रे दरम्यान या वृक्षाखाली कीर्तन करून जन्ममाणसांचे प्रबोधन केल्याचे आठवणीतील काही संदर्भ वयोवृद्ध स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive incident about banyan tree at vani nashik marathi news